WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीच्या कलावंतांनी शेतकऱ्यांना दिले जीवन जगण्याचे तंत्र.... बळीराजा चेतना अभियाना अंतर्गत जनजागृती..

ImageImageImage

सागर मुने,वणी

भारत देश्याची कृषी प्रधान देश म्हणून ओळख आहे.

संपूर्ण देशात शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत असून आत्महत्या वाढत आहेत. शेतकरी जगला तर देश वाचेल , यासाठी सरकार च्या वतीने शेतकरी आत्महत्या थांबव्या म्हणून बळीराजा चेतना अभियान अंतर्गत शेयकर्यांनी आत्महत्या करू नये यासाठी कार्यक्रम सुरू केले आहे.

वणी तालुक्यातील लाठी, तरोडा येथे सागर झेप बहुद्देशीय संस्थेच्या वतीने मनोरंजनात्मक माध्यमातून शेतकरी सक्षम व सुदृढ कसा होईल अशी जनजागृती करून शासनाच्या योजना शेतकऱ्यांना शेती साठी मिळणारे लाभ व आत्महत्या करण्यापेक्षा आपल्या कुटुंबाचा विचार करून उत्कृष्ट शेतकरी होऊन देशाची शान होऊ अशा पध्दतीने जनजागृती करण्यात आली.

ग्रामीण भागातील वास्तववादी जीवनाला अनुसरून नाटक सादर करण्यात आले ज्यामध्ये सागर मुने,आकाश महाडोळे,अविनाश शिवनीतवार,गजानन कोरंगे, मंगेश गोहोकर, शुभम उगले, तेजस्विनी तुराणकर, प्रांजली निमसरकर,ढोलक वर अक्षय करसे इत्यादी होते कलावंत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकेश खोके यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकाश चार्लीकर यांनी केले. लाठी येथील ग्रामपंचायत सदस्य राहुल खारकर व तरोडा येथील ग्रामपंचायत सदस्य सतीश वाराटे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला गावातील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......