WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी- मुकुटबन मार्गावर भरधाव वाहनाने दुचाकीस्वारांना चिरडले; अज्ञात वाहन पसार तर दोन तरुण ठार

Image

प्रतिनिधी/ संघर्ष भगत (झरी जामनी)

मुकुटबन- वणी मार्गावरील गुरुकुल कॉन्व्हेंट शाळेजवळ एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली.या अपघातात दोन तरुन ठार झाल्याची घटना घडली आहे.

आज दुपारी दोन युवक दुचाकी क्र. MH-34 AZ 2378 ने जात असता मुकुटबन- वणी मार्गावरील गुरुकुल कॉन्व्हेंट शाळेजवळ एका अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीचा धडक दिली.या अपघातात दुचाकीवरील एक युवक जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला होता.त्याला रुग्णवाहिकेने वणी येथे ग्रामिण रुग्णालयात दाखल केले होते.परंतु उपचारा दरम्यान त्याचाही मृत्यु झाला आहे.हा अपघात पहायला मुकुटंबन परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

या अपघातातील धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा अजूनपर्यंत पत्ता लागलेला नाही तसेच त्या दोन्ही युवकांची ओळख सुद्धा पटलेली नसुन ते दोन्ही युवक गीट्टी खदानिवरील असल्याचे बोलल्या जात आहे. पुढील तपास मुकुटबन पोलीस करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले