WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सुतार समाज वणी च्या वतीने प्रभू विश्वकर्मा जयंतीचे आयोजन,

Image

वणी

मयात्मज विश्वकर्मामय झाडे सुतार समाज संस्था,वणी महिला मंच, व युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सुतार समाजाचे आराध्य दैवत व कुशल कामगारांचे देव प्रभू विश्वकर्मा यांची जयंती दिनांक ७ फ़्रेबुवारी २०२० रोज गुरुवार ला विविध कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात येत आहे

दरवर्षी प्रमाणे यावर्षालाही प्रभू विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात येणार आहे यात दिनांक ७ फ़्रेबुवारी ला सकाळी ७:०० वा शहराती प्रमुख चौकाचौकात रांगोळी स्पर्धा, सकाळी ९:०० ते १२:०० वाजता शोभायात्रा महादेव मंदिर सुतार पुरा वॉर्ड येथून निघणार व नटराज चौक,गांधी चौक, अणे चौक,डॉ,आंबेडकर चौक,टागोर चौक,सर्वोदय चौक,भगत सिंग चौक,गाडगे बाबा चौक व महादेव मंदिर येते समारोप करण्यात येणार शोभयात्रेचे वैशिष्ट्य बँड पथक,कलश धारी महिला व समाजातील महिला व पुरुष मंडळी उपस्थित असणार आहे दुपारी १२:०० वाजता प्रभू विश्वकर्मा यांची विधिवत पूजा व महाआरती नंतर जयंती उत्सव साजरा करतात येणार यात निमंत्रित मान्यवर व स्थानिक पदाधिकारी आणि समाज बांधवांच्या उपस्थित विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण, गुणवंत विद्यार्थ्यांन चा सत्कार, समाजातील समाज बांधवांना सुतार समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे आणि स्नेह भोजनांने कार्यक्रमाची सांगता होणार आहे साय, ६:०० वा समाजातील लहान मुलांना करिता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे वरील सर्व कार्यक्रमात शहरातील व परिसरातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे निमंत्रण मयात्मज विश्वकर्मामय झाडे सुतार समाज संस्था वणी चे अध्यक्ष अमन बुरडकर व सचिव पुरुषोत्तम नवघरे यांनी केले आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

CAR