WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

हब ऑफ लर्णीग कार्यक्रम साजरा.....

Image

सागर मुने, वणी

सी. बी. एस. ई .बोर्ड आणि मॅकरून स्टुडंट्स अकादमीच्या संयुक्त विद्यमाने मॅकरून शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे शिक्षणाचे केंद्र या प्रणाली खाली यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा एकत्रित येवून विध्यार्थ्यांचे कला कौशल्य जागृत होणे गरजेचे ठरते . ठरलेल्या कार्यक्रमात जिल्ह्यातील मॅकरून स्टुडंट्स अकादमी स्कुल वणी , स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कुल वणी , स्कॉलर इंटरनॅशनल स्कुल मरेगाव , स्कूल ऑफ स्कॉलर यवतमाळ , जवाहरलाल दर्डा स्कुल यवतमाळ , शुशगंगा पब्लिक स्कुल वणी अशा एकूण 8 शाळा सहभागी झाल्या. सांस्कृतिक कार्यक्रमात गायन , नृत्य , नाट्य ग्रुप आणि एकल अशा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून स्पर्धेत एकूण 160 विध्यार्थ्यांनि सहभाग घेतला होता.

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर अध्यक्ष पी.एस.आंबटकर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असून प्रमुख पाहुणे स्वर्णलीला शाळेचे वणीचे मुख्याध्यापक शिवा रामा कृष्णा, मुख्याध्यापक विनोद सर शुशगंगा वणी, प्रिन्सिपॉल शोभना मॅडम एम एस ए वणी आणि शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक जान्हवी आसुटकर , नेहा निमसटकर , संचालन अदीबा शेख , आकांक्षा पवार यां विध्यार्थ्यांनिनी केले. कार्यक्रमात गायन स्पर्धा दानिश शेख चंद्रपूर ,दीपिका ढवस मॅडम वणी , नृत्य स्पर्धा विजय श्रीवास सर भद्रावती , अविनाश शिवनितवार सर वणी , नाट्य स्पर्धा अश्विनी लोढे मॅडम वणी , नितेश कुरेकार वणी यांनी परीक्षक म्हणून कार्य केले . बक्षीस वितरणाचा कार्यक्रम अध्यक्षतेखाली घोषित करण्यात आला गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक मॅकरून वणी , द्वितीय स्वर्णलीला वणी , तृतीय जवाहर दर्डा यवतमाळ या शाळेंनी अनुक्रमे घेतला . नृत्य स्पर्धेत प्रथम मॅकरून वणी , द्वितीय स्वर्णलीला वणी , तृतीय मॅकरून वणी अनुक्रमे घेतला. नाट्य स्पार्धेत स्कुल ऑफ स्कॉलर यवतमाळ नि प्रथम क्रमांक घेतला. एकूण सर्व स्पर्धेत मॅकरून वणी शाळेंनी सर्वात जास्त गुण मिळवून प्रथम क्रमांकाची मानकरी झाली . आभार प्रदर्शन अता हैदरी यांनी केले . शाळेचे सर्व शिक्षक वृंद यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.