WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

महसूल विभागाचा भोंगळ कारभार...क्रिडा व सांस्कृतीक स्पर्धेत नियोजनाचा अभाव...

Image

महसुल प्रशासनाच्या वतीने येथील शासकीय मैदानावर क्रिडा व सांस्कृतीक स्पर्धेचे आयोजन मोठया थाटात करण्याचे ठरले असतांना स्थानिक अधिकाÚयांनी केलेले नियोजन धांदात फसवे निघाल्याची चर्चा वणीकर नागरीक करतांना दिसत असुन उदघाटनाच्या कार्यक्रमांत चमकोगीरीला उधाण आले होते तर क्षणोक्षणी नियोजनाचा अभाव प्रकर्शाने जाणवत असल्याने स्पर्धेत अनागोंदी निर्माण झाली होती.

जिल्हास्तरीय क्रिडा व सांस्कृतीक स्पर्धा येथील शासकीय मैदानावर आयोजीत करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी सकाळी 10 वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांचे हस्ते करण्यात आले. महसुल विभागाच्या वरिष्ठ अधिकाÚयांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या उद्घाटनिय कार्यक्रमांनंतर विविध खेळांच्या स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. परंतु जिल्हाभरातुन आलेल्या खेळाडूच्या निवास व अन्य व्यवस्थेची खबरदारी घेण्यात आल्याचे दिसले नाही.

स्थानिक महसुल प्रशासनाने भालर येथील वेकोलीचे विश्रामगृह खेळाडू करीता आरक्षीत करावे असे आर्जव केले होते परंतु ते विश्रामगृह अतिमहत्वाच्या राजकीय तथा सनदी अधिकाÚयांनाच आबंटीत केल्या जात असल्याने खेळाडूंच्या निवासाची व्यवस्था वणीतच इतरत्र करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे भव्य आयोजना करीता आर्थिक स्त्रोत काय होता हे कळायला मार्ग नसुन तालुक्यातील महसुल विभागा सोबत सलग्न असलेल्यांकडून देणगी स्वरुपात रोख रक्कम जमा करण्यात आल्याची चर्चा जोर धरायला लागली आहे. यामध्ये रेती व्यवसायीक, सेतू सुविधा केंद्र धारक, राशन दुकानदारांचा समावेश असावा असा कयास लावल्या जात असला तरी यातुन नेमकी किती बिदागी जमा होणार हे नियोजनाअंतीच उघड होणार आहे. एकुनच महसुल विभागाच्या वतीने होत असलेल्या तीन दिवसीय क्रिडा व सांस्कृतीक स्पर्धेत नियोजनाचा अभाव मात्र प्रकर्शाने जाणवणार आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......