WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भामसं चे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन आज . सहभागी व्हा गजानन वैद्य !

Image

भारतीय मजदूर संघ यवतमाळ जिल्हा तर्फे त्रैवार्षिक अधिवेशन आज दिनांक 9फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे कामगारांची उपस्थिती कामगारांची शक्ती व विश्वास वाढवणारी ठरणार आहे .

उदघाटन समारंभ स्व अशोक सबनिस नगर ,लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयात ,अवधुतवाडी ,दत्त चौक यवतमाळ येथे सकाळी 10:30 वाजता सुरू होणार असून कार्यक्रमाचे उदघाटन माजी आमदार तथा अध्यक्ष एज्युकेशन सोसायटी यवतमाळ दिवकरराव पांडे राहणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष भामसं चे प्रदेश अध्यक्ष रमेश बल्लेवार राहणार असून प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यवतमाळ जिल्हा सह संघचालक प्रदीप वडनेरकर,विदर्भ प्रदेश सचिव भामसं प्रकाश सोवनी, कामगार आयुक्त यवतमाळ आर आर काळे हे राहणार आहे .कामगार बंधूनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून आपली संघटन शक्ती दाखवावी असे आवाहन जिल्हा सचिव पांडुरंग सानप ह्यांनी केले आहे

अशी माहिती ऐका प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसाद नावलेकर ह्यानी कळविली आहे

आपला

प्रसाद नावलेकर

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले