WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जो प्राणी मारायची परवानगी नाही तोच प्राणी मारा जबाबदारी आम्ही घेऊ...... चंद्रकांत वानखेडे ....

Image

वणीत विदर्भ स्तरीय शेतकरी परिषदेे ला उत्स्फूर्त प्रतिसाद……

परिषदेत गरजले शेतकऱ्याचे कैवारी.....

सुरज चाटे वणी :- विदर्भातील शेती सध्या वन्यप्राण्यांच्या हौदोसात अडकली आहे. वन्य प्राण्यांच्या हौदोसामुळे शेतक-यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. पुढील काळात शेती करणे सुध्दा कठीण होणार आहे. यावर विस्तृत चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी वणीत आज पहिल्यांदाच विदर्भ स्तरीय शेतकरी परिषदेचे आयोजन दिनांक 7 आक्टोबर ला दु 2 वाजता करन्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटक शेतकरी नेते तथा माजी खासदार नाना पटोले,आणि अध्यक्ष म्हणून शेतकरी प्रश्नाचे अभ्यासक चंद्रकांत वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती, यावेळेस आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना चंद्रकांत वानखेडे म्हणाले की महिन्या दोन महिन्यात असे कार्यक्रम घेत जा त्या कार्यक्रमात आम्हाला सुद्धा बोलवा आणि ज्या प्राण्यांमुळे शेतकऱ्याना त्रास होतो व त्यांना मारण्यास शासनाची बंदी आहे अश्या प्राण्यांना मारा त्याची जबाबदारी आम्ही घेऊ आम्ही सांगू की हे आम्ही मारले असे आपले मत मांडीत त्यांनी आक्रमक शेतकऱ्यांची बाजू मांडीत वन्य प्राण्यामुळे शेतकऱ्यांना निर्माण होणाऱ्या समस्या व शासनाने करावयाचे नियोजन यावर विस्तृत बाजू मांडीत स्पष्टीकरण दिले.

विदर्भातील शेती सध्या न परवडण्या सारखी झाली आहे. एकीकडे अस्मानी संकट तर दुसरीकडे सुल्तानी संकट. अशा विवंचनेत येथील शेतकरी अडकला असतांना आता वन्यप्राणी सुध्दा नासाडी करण्यासाठी शेतीकडे वळले आहे. जिकडे तिकडे रोही,डुकरांचे कळप बघायला मिळते आहे. पुर्वी शेतातील धान्य चोरीला जावू नये म्हणून बळीराजा राखण करण्यासाठी रात्री शेतात रखवाली करण्यासाठी जात होते. आता वन्यप्राण्यांचा कळप हाकलून लावण्यासाठी येथील शेतक-याला रात्री बेरात्री अंधारात शेतात जावे लागत आहे. कुठे साप तर कुठे विंचू कधी सर्पदंश तर कधी काय? असे असतांना सर्पदंशासाठी शासनाची धड मदत सुध्दा नाही. रोपटे लावल्यापासूनच त्या पिके बहरण्यापर्यंत पिकांची रखवाली करण्यासाठी येथील शेतक-याला घरदार मागे टाकून शेतात जावे लागत आहे. दिवसंेदिवस रोही आणि डुकरांची संख्या दरडोई दहा ते पंधरा टक्यांनी वाढतच आहे. या वन्यप्राण्यांमुळे बळीराजा पुरता डबघाईस आला आहे. पिढीजात व्यवसाय असलेला शेती व्यवसाय या वन्य प्राण्यांच्या होैदोसामुळे आता संकटात आला आहे. तर दुसरीकडे परिसरात वाघांचा मुक्तसंचार सुरू आहे. शेतक-यांची जनावरे वाघांच्या हल्यात मृत्युमुखी पडले आहेत. तर कित्येक शेतकरी वाघांच्या हल्यात जखमी आणि मृत्यूमुखी पडल्याच्या घटना देखिल घडल्या आहेत. या वन्य प्राण्यांमुळे शेतक-यांची दयनिय अवस्था असतांना शासन याकडे जणू कानाडोळा करीत असल्याचे यावेळी उपस्थितांनी बोलून दाखविले, आजवर याबाबत शासनाने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नसून परिणामी शेतकरी पुरता संकटात अडकला आहे. त्यामुळे यावर तात्काळ उपाययोजना कराव्या जर उपाययोजना झाली नाही तर वन मंत्री सुधीर मूनघंटीवार यांच्या घरात बोकड्या बांधू असे प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बचू कडू यांनी आपल्या भाषणात बोलून दाखविले, उदघाटक खा नाना पाटोले यांनी सुद्धा शेतकऱ्यांना होणारी अडचण लक्षात घेता त्यांच्या बाजूने आम्ही खंबीर उभे राहू आणि शतकऱयांना न्याय मिळवून देण्यासाठी उभे राहू असे आपल्या भाषणात त्यांनी बोलून दाखविले, यावेळी संपूर्ण विदर्भातील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात आले होते, विविध भागातून शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून आपल्याला न्याय मिळावा या उद्देशाने उपस्थित राहून आपले मत परिषदेच्या शेवटी घेण्यात आलेल्या ठरावात त्यानी मांडले. माजी आ वामनराव चटप यांनी सुद्धा शेतकऱ्यांना उपयुक्त असे मार्गदर्शन केले, यावेळी लढा शेतकरी हक्काचा तर्फे घेण्यात आलेल्या वसंत जिनिंग लाँन वणी येथे देशातील पहिल्या विदर्भ स्तरीय शेतकरी परिषद ला मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतमजुरांनी उपस्थिती लावली असून या परिषदेचा विषय असलेल्या वन्य प्राण्यामुळे शेतकऱ्यांना निर्माण होणाऱ्या समस्या व शासनाने करावयाचे नियोजन यावर योग्य मार्गदर्शन उपस्थितांनी यावेळी केले, यावेळी शेतकरी नेते नाना पटोले, शेतकरी प्रश्नाचे अभ्यासक चंद्रकांत वानखेडे, आमदार बच्चू कडू, डि.एम राउत सेविनिवृत्त वन अधिकारी, माजी आमदार वामनराव चटप, शरद निंबाळकर, माजी कुलगुरू, देवराव भोंगळे जी प अध्यक्ष चंद्रपूर, वीणाताई महाकुलकर, प्रफुल मानकर, प्रकाश मानकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते, या परिषदेला विविध स्तरावरील राजकीय पदाधिकारी, शेतकरी, शेतमजूर उपस्थित होते.

शेतकऱ्यांसाठी योग्य कायदा त्याचे संरक्षण होत पर्यंत माझी लढाई राहील.... माजी खा नाना पटोले...

वणी येथे झालेल्या विदर्भ स्तरीय शेतकरी परिषदेत शेतकऱ्या साठी आम्ही केव्हाही तयार आहो शेतकऱ्यांसाठी योग्य कायदा व त्यांचे संरक्षण होत नाही तो पर्यंत माझी लढाई राहील असे यावेळी माजी खासदार नाना पटोले यांनी यावेळी बोलून दाखविले.

जात धर्म सोडून शेतकऱ्यां करिता एकत्र या वाघाची बकरी केल्याशिवाय राहणार नाही.... आ बचू कडू

वणी येथे आयोजित विदर्भ स्तरीय शेतकरी परिषदेत आमदार बचू कडू यांनी उपस्थिती लावीत त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की सर्वात महत्वाच म्हणजे जात धर्म सगळं सोडून जे आपल्याला पिकवून खाऊ घालतात असा शेतकरी या शेतकऱ्यां साठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असून सर्व एकत्र आल्यास त्या शेतशिवारात फिरणाऱ्या वाघाची जर बकरी बनवली नाही तर पहा असे यावेळी बोलताना बचू कडूनी शेतकऱ्यांना सांगितले त्यांना उपयुक्त असे मार्गदर्शन केले.

चंद्रपूर जि प अध्यक्ष व शेतकऱ्यांत जुंपली.....

विदर्भ स्तरीय शेतकरी परिषदेला प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित झालेल्या चंद्रपूर जि प चे अध्यक्ष देवराव भोंगळे यांचे भाषण सुरू असताना त्यांनी बळीराजा बद्दल 21 शासन निर्णयाची माहिती देत असताना परिषदेतील शेतकरी आक्रमक होऊन ही खोटी माहिती असल्याचा दावा करीत वाटप केलेल्या अन्न दाता सुखी भव हे पुस्तक फाडून सरकारचा निषेध व्यक्त केला, यात भोंगळे यांनी सांगितले की त्या पुस्तकात सर्व माहिती दिली आहे, तुम्ही जर शासन निर्णय पाहणार नाही तर तुम्हाला समजणार कसे यावर उपस्थित काही शेतकरी व चंद्रपूर जि प चे अध्यक्ष यांच्यात जुंपली. त्यांनी सुद्धा आपली बाजू मांडली.

वणीत विदर्भ स्तरीय शेतकरी परिषदेेत 4 मागण्या चा ठराव...

1) शेतातील उभ्याशेत मालाचे वन्य पशुपासून होणारे नुकसान टाळण्याकरिता शासनाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा,
2) झालेल्या नुकसानीचे विना विलंब भरपाई शासनाने करावी,
3) वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासंदर्भात वन्य पशु संरक्षण कायद्यात बदल करून वेळीस बंदोबस्त करण्याचे शेतकर्यांना स्वातंत्र्य द्यावे,
4) वन्य प्राणी जंगल क्षेत्रातून बाहेर पडून शेत शिवारात येऊ नये, याकरिता शासनाने वन्य अधिवासास कुंपण घालावे, तसेच जंगल लगतच्या शेताला सौर कुंपण शासनाने करावे, वरील मागण्या एक महिन्यात मान्य न झाल्यास लढा शेतकरी हक्काचा याद्वारे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ठराव विदर्भ स्तरीय शेतकरी परिषदेत वणी येथे आयोजित परिषदेत घेण्यात आला आता यावर कोणता तोडगा निघते किती मागण्या मान्य होतात यावर शेतकऱयांचे लक्ष लागले आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share