WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

विदर्भ राज्य आंदोलन समितीचेे रस्ता रोको आंदोलन..... वाहतूक कोंडी मुळे नागरिक त्रस्त....

Image

सागर मुने, वणी

आज दि.10 जानेवारीला विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने वणीत रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले. शासन स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचा निर्णय घेत नसल्यामुळे विदर्भातील जनतेमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. सरकार कडून गेली 60 वर्षांपासून विदर्भावर सातत्याने अन्याय होत आहे. शेतकरी आत्महत्या,कुपोषण,नक्षलवाद,वीज महाग,विदर्भातील युवकांच्या नौकऱ्या पळवणे असा अन्याय होत आहे.

त्यामुळे विदर्भ राज्य आंदोलन समिती कडून सन 2023 साठी विदर्भ मिशन अंतर्गत ऍक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. याअंतर्गत आंदोलनाची रूपरेषा आखण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणुन आज रास्तारोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले.

स्वतंत्र विदर्भ राज्याची त्वरित निर्मिती करा व विदर्भातील जनतेसाठी विजेचे दर निम्मे करा,वेगळा विदर्भ झालाच पाहिजे,लेके रहेंगे लेके रहेंगे विदर्भ राज्य लेके रहेंगे,विदर्भ के गद्दारो को जुते मारो सालो को अशा घोषना देत वणी येथिल नागपूर रोड च्या पहिल्या टी पॉईंट शिरपूर बाय पास चौकामध्ये चक्का जांम आंदोलनात करण्यात आले. यावेळी नागपुर,घुग्गुस,वणी मार्गावर काही वेळापुरता चक्काजाम झाला होता.परंतु ठाणेदार वैभव जाधव यांनी पोलीसांचा चोक बंदोबस्त ठेवल्यामुळे हा रास्ता रोको फार काळ ठेवता आला नाही. त्यामुळे हा रास्ता रोको शांततेत पार पडला. मात्र वाहतूक कोंडी मुळे लांबच लांब वाहनाच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे जनतेला रस्ता रोको चा आंदोलनामुळे त्रास झाला.

यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम पाटील,कोर कमिटी सदस्य रफिक रंगरेज,युवक जिल्हा अध्यक्ष राहुल खारकर,शेतकरी नेते देवराव धांडे,नारायण काकडे,संजय चिंचोळकर,बाळा राजूरकर, दशरथ पाटील,होमदेव कनाके,विजयाताई आगबत्तलवार,राजु पिंपळकर,संजय चिंचोळकर,बालाजी काकडे,सृजन गौरकर,अमित उपाध्येय,मिलिंद पाटील,प्रियल पथाडे,दीपक नरवडे,अलका मोहोड,आनंदराव पानघाटे, अनिल गोवारदीपे,शरद खोंड,महादेव देऊलकर,दिगंबर पुनवटकर,सुरेखा वाडीचार यांचेसह महिला,पुरुष,युवक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.