WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मारेगाव येथे रविदास महाराज जयंती साजरी

Image

प्रतिनिधी/ सचिन मेश्राम (मारेगाव)

श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांची ६४३ वी जयंती तथा सर्व संत स्मृतीदिन सोहळा मारेगाव येथे संपन्न झाला. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी गटशिक्षणाधिकारी जी. एल. खोले, प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठलराव टोंगे उपाध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ, भगवानजी इंगळे ,

गंगाधर महाराज लोनसावले, ग्रामगीताचार्य मनीषाताई टोंगे, नगरपंचायत सदस्या सविताताई दरेकर, महिला अध्यक्ष रविदास महाराज चर्मकार संघ प्रेमिलाताई बेंडे, गणपतराव येरेकर, कवडूजी लिपटे उपस्थित होते. यावेळी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी परिसरामधून भजन दिंडी सुद्धा मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. तसेच मारेगाव येथे समाजभवनाच्या नामफलकाचे उदघाटन आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते करण्यात आले. मारेगाव येथील युवा प्रबोधनकार कु. स्वाती किशोर ठेंगणे यांनी यावेळी सर्वांना प्रबोधन केले. याप्रसंगी मारेगाव तसेच परिसरातून मोठ्या प्रमाणावर समाज बांधव उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले