WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कुंभा येथील तरुण शेतकऱ्याचा विहिरीत पडुन मृत्यु

Image

प्रतिनिधी/ सचिन मेश्राम (मारेगाव)

कुंभा-येथील बावीस वर्षीय तरुण शेतकऱ्याचा जाऊन विहिरीत पडल्याने मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना दि.10 रोजी सायंकाळी चार वाजता दरम्यान घडली. स्वप्निल नामदेवराव महाजन वय 22 वर्ष राहणार कुंभा असे मृतक तरूण शेतकऱ्याचे नाव आहे. मृतक काल सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान शेतामध्ये बांधून असलेल्या बैलांना पाणी पाजण्याकरिता पाणी काढत असताना अचानक तोल जाऊन विहिरीत पडला. सायंकाळ होऊनही मृतक घरी न आल्याने घरच्या मंडळींनी शेताकडे शोधाशोध केली असता विहिरीजवळ मृतकांची चप्पल व पाण्याची बाटली सापडली.

विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असल्याने शोध घेण्यास अडचण निर्माण झाली होती.विहिरीचे पाणी संपूर्ण तोडल्यानंतर गाळात मृतदेह आढळून आला. याबाबत गावात माहिती मिळताच शेताकडे धाव घेत मृतदेह बाहेर काढला याबाबत मारेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यू ची नोंद घेतली असून पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले