WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीत क्रिकेटचा जल्लोष होणार....नगराध्यक्ष क्रिकेट चषकाचे टेनिस बॉलचे रात्रकालीन खुले सामने

Image

सागर मुने, वणी

येथील शासकीय मैदानावर दि.13 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी पर्यंत नगराध्यक्ष आयोजन समिती तर्फे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचे कल्पकतेतून रात्रकालीन टेनिस बॉलच्या नगराध्यक्ष क्रिकेट चषकाचे आयोजन करण्यात आले आहे.

या नगराध्यक्ष क्रिकेट चषकाचे उदघाटन माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचे हस्ते होणार आहे. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे जिल्हा अध्यक्ष नितीन भुतडा, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, पोलीस निरीक्षक वैभव जाधव, मुख्याधिकारी संदीप बोरकर, प्रसिद्ध व्यावसायिक आशुतोष शेवाळकर, टॉपवर्थ ऊर्जा मेंटलचे संचालक सुरेंद्र लोढा, आनंद कोठारी उपस्थित राहणार आहेत.

या परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या स्पर्धेत बक्षिसांची लयलूट असून प्रथम पुरस्कार एक लाख रुपये, द्वितीय पुरस्कार एक्कावन हजार, तृतीय पुरस्कार एकवीस हजार रुपये ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे भारतातील प्रसिद्ध पंच शंकर धोत्रे ( डांसीग अंपायर गोट्या) दि.15 व 16 फेब्रुवारीला पंचफिरी करणार आहे. अंतिम सामन्यात खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूंना आकर्षक चांदीचे मेडल व आकर्षक स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे.

विद्युत रोषणाईचे मोठं मोठे टॉवर उभारून हे रात्रकालीन क्रिकेट सामने होणार आहे. ड्रोन कॅमेराने चित्रित खेळ एलइडी स्क्रीन, लाइव्ह युट्यूब व स्थानिक चॅनेल वर प्रक्षेपण करण्यात येणार आहे. महिला, पुरुष व निमंत्रितांसाठी बसून सामने पाहण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. अशी माहिती आयोजन समितीने दिली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले