WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी येथे संत रविदास स्मृतिदिनपर अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.

Image

महेश लिपटे :- वणी येथील संत रविदास सभागृहात *समतेचा संदेश देणारे संत शिरोमणी रविदास महाराज* यांचा आज ५०० वा स्मृतिदिन यानिमीत्य संत रविदास चर्मकार सुधार मंडळ,वणी आणि संत रविदास युवा मंच वणी यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.

याप्रसंगी सुरूवातीला चर्मकार बघिणी स्मृतिशेष डॉ. कु.शुभांगी हांडे यांना श्रद्धांजलीपर मौन घेऊन श्रद्धांजली वाहन्यात आली.

अभिवादन कार्यक्रमासाठी उपस्थीत असलेले संबाजी वाघमारे,दौलत वाघमारे,राजू वाघमारे,भारत लिपटे,हेमंत वाघमारे,संदिप वाघमारे,किशन कोरडे,विनोद ढेरे,अमोल बांगळे,मिलींद पिंपळकर,रवि कोरडे,वैभव उपाध्ये,शाम गीरडकर यांनी स्मृतिदिन अभिवादनपर तसेच समाज संघटनपर विचार प्रकट केले.

या अभिवादन कार्यक्रमाला चर्मकार समाज बांधव उपस्थीत होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेश लिपटे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन रवि धुळे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संत रविदास चर्मकार सुधार मंडळ,वणी आणि संत रविदास युवा मंच वणीच्या कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले