WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी ची कुलस्वामिनी आई जैताई माता,,,

Image

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके । शरण्येत्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुऽते॥

नवरात्र उत्सव म्हटलं की नवदुर्गा,तुळजाभवानी, महालक्ष्मी, अशा अनेकविध देवीचे रूप डोळ्यापुढे येते, या मातांचे मनोभावे दर्शन घेण्याची इच्छा निर्माण होते,

नमो दुर्गे, नमो सुख करणी, नमो दुःख हरणी माता दुर्गा

वणी शहरात जवळपास लहान मोठी ४०-५० मंदिरे आहेत त्या सर्वात यवतमाळ मार्गावरील जैताई मातेचे मंदिर गावांतील समाजाच्या सर्व स्तरातील भाविकांचे फार मोठे श्रद्धास्थान झाले आहे जवळपास बाराही महिने या मंदिरात भंजन, प्रवचन,कीर्तन, व्यख्यान,भागवत, रामकथा,इत्यादी कार्यक्रम चालू असतात गावातील धार्मिक,सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमाचेही ते आज गावातील महत्वाचे केंद्र बनले आहे.

१९६९ पर्यंत नवरात्र शिवाय फारच थोडें लोक या मंदिरात दर्शनासाठी येत मंदिराच्या आजूबाजूला जंगळसदृश भाग होता नवरात्रीचा उत्सव लहान स्वरूपात का होईना परंतु भक्तिभावाने गुलाबराव बाकडे व मधुकरराव तालकवार त्याही काळात करीत स्व, नानासाहेब दामले, वणीचे पोलिसपाटील स्व, सांबशिवराव पाटील , प्रयागदास नरसिंगदास चे मुनीम स्व,मथुरादासजी ,स्व हरिदासभाईजी अदानी यांनी त्या काळात मंदिराचा जीर्णोद्धाराचा पहिला प्रयत्न केला १९६५ मध्ये वणीच्या लोकमान्य टिळक महाविद्यालयामध्ये प्रसिध्द वक्ते व विचारवंत राम शेवाळकर प्राचार्य म्हणून रुजू झाले त्यांनी जैताई मंदिराच्या आवारात एका गांधी जयंती ला विध्यार्थी व प्राध्यापकासह श्रमदान केले श्रमदानाच्या मधल्या विश्रांती च्या काळात त्यांनी श्रमदान करून जैताई चे मंदिर बांधून घायचे काय? असा प्रश्न आपल्या विध्याथ्याना केला त्याला सर्व विद्यार्थ्यांनी तत्परतेने होकार दिला आणि ३ सप्टेंबर १९६९ ला पहिली कुदळ मारून श्रमदानाला सुरुवात केली प्राचार्य, मुख्यध्यापक व विद्याथ्याचे हे निष्ठापूर्वक चाललेले श्रमदान पाहून गावातील सर्व स्तरांवर नागरिक त्यात स्वयंसपूर्तीने सहभागी होऊ लागले मंदिराचा जिनोद्धार करण्यासाठी गावात घरोघरी जाऊन अगदी एका रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत च्या देणगीचा तसेच बांधकाम साहित्य चा वास्तुरूपात स्वीकार करण्यात आला श्रमदान व लोकवर्गणीतून जमा झालेल्या ४०,००० रुपये यातून मंदिराचा सुंदर सभामंडप १९७१ पर्यंत उभा झाला १९६९ मध्ये मंदिराच्या जिनोद्धाराच्या केलेल्या संकल्पना सांगता भव्य प्रमाणात शतचंडी यज्ञ करून झाली , १९७१ मधील मंदिरातील नवरात्र उत्सव अतिशय उत्सवात साजरा झाला,

मंदिराच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य राम शेवाळकर, कार्यवाह नानाजी भागवत व तत्कालीन संचालक मंडळ यांच्या परिश्रमातून व नियोजनाने मंदिराने मोठीची प्रगती केली, मंदिराचे पुजारी साधुबुवा संताने यांच्यासाठी निवासस्थान, दोन अतिथीगृह, स्वयंपाकगृह, यज्ञमंडप, समान ठेवण्याच्या दोन खोल्या, बगीचा, आमदार वामनराव कासावार यांच्या आमदार निधीतून सभागृह अशी फार मोठी कामे त्यांच्या कार्यकाळात झाली त्यानंतर कार्यवाह नानाजी भागवत यांच्या निधनानंतर त्याचे सुपुत्र बापू भागवत यांनी दिलेल्या देणगीतून मातृभक्त नानाजी च्या स्मृतिप्रीत्यर्थ भव्य कामाणीचे प्रवेशद्वार बांधण्यात आले मंदिराचे स्वतंत्र कार्यालय तयार करण्यात आले तसेच सभागृहाच्या वर दानशूर प्राथमिक शिक्षक म,ता, राजूरकर व बुवाजी आसुटकर यांच्या उदार देणगीतुन दोन अतिथीगृहे बांधण्यात आली श्रीमती विजयाताई शेवाळकर यांनी दिलेल्या देणगीतून किर्तनकेसरी भाऊसाहेब शेवाळकर बलोध्यान तयार झाले, संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार मंदिराच्या परिसरात स्व,प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठ साकारण्यात आले आहे,

महाराष्ट्रातील बहुसंख्य नामवंत कीर्तनकार,प्रवचनकार, गायक ,समाजसेवक, सिने कलावंत ह्यांनी मंदिरात आपली सेवा रुजू केली असून मंदिराची त्यांनी मुक्तकंठाने प्रश्नासा केली आहे, मंदिराने समर्पित मातृत्व शक्तीचा गौरव करण्यासाठी २००९ पासून नवरात्रात ' श्री जैताई मातृगौरव पुरस्कार ' देने सुरू केले आहे, रुपये ११,०००/- रोख, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे, श्रीमती साधनाताई आमटे, सिंधुताई सपकाळ, डॉ राणी बंक, डॉ स्मिता कोल्हे,डॉ मंडकीनी आमटे, अपर्णाताई रामतीर्थकर, सीमा साखरे, सुचेता धामणे, मेधा पाटकर,इत्यादी थोर महिलांना देणात आले या वर्षी या पुरस्काराचे दहा वे वर्ष असून या वर्षीचा पुरस्कर अँड पारोमिता गोस्वामी यांनी त्यांच्या समाजिक कार्याची दखल घेत याना देण्यात येणार आहे या मंदिराचा आणखी एक अभिनव व वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम म्हणजे मंदिराद्वारा दरवर्षी धनत्रयोदशी ला दिवाळीनिमित्त पहाटे ६ वाजता कीर्तन आयोजित केल्या जाते, किर्तनकेसरी भाऊसाहेब शेवाळकर जन्मशताब्दी वर्षापासून म्हणजे १९९९ पासून हा उपक्रम सुरू केला असून त्याला श्रोत्यांचा उत्साहवर्धक प्रतिसाद आहे अशा रीतीने मंदिर उत्तरोत्तर प्रगतीपथावर आहे ,,,,,,,जय माता दि ,,,,जय जैताई माता ,,,,,

- पुरुषोत्तम रामेश्वर नवघरे ,वणी,ता वणी, जिल्हा- यवतमाळ ९६८९१८१७०२ ********************

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले