WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

नवरात्री उत्सवा निमित्य भक्तांना मोफत ऑटो सेवा...

Image

क्रांती युवा संघटनेचा पुढाकार...

वणीतील संकल्प मित्र मंडळ तथा क्रांती युवा संघटने तर्फे मोफत ऑटो सेवेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उदघाटन दिनांक 13 ला सकाळी 7 वाजता गाडगे बाबा चौक येथे करण्यात आले असून रोज सकाळी भक्तांच्या सेवेत सदर संघटना कार्य करणार आहे.

दिनांक 13 ला सकाळी ठीक 7 वाजता जैताई मंदिर तथा श्री साई मंदिर येथे दर्शनाकरिता जाणाऱ्या भाविक भक्तांना संकल्प मित्र मंडळ तथा क्रांती युवा संघटने तर्फे मोफत ऑटो सेवा पुरविण्यात येत असून यातून भक्त गणांना जाणे तसेच येणे कोणतीही शुल्क न आकारता सेवा पुरविण्याच्या कार्यक्रमाचे उदघाटन दिनांक 13 ला सकाळी 7 वाजताच्या दरम्यान करण्यात आले असून यावेळी उदघाटक म्हणून राकेश भाऊ खुराणा, ओम भाऊ ठाकूर, बाबूलाल पोटदुखे, उपस्थित होते. संकल्प मित्र मंडळ ही संघटना गेल्या 15 वर्षा पासून सतत नवरात्र मध्ये भाविक भक्तांना मोफत येण्या जाण्याची व्यवस्था करून त्यांना सेवा देण्याचे कार्य करीत आहे, त्यांच्या या कार्याला साथ देत युवा क्रांती संघटना त्यांच्या पावलावर पाऊल टाकीत त्यांनी सुद्धा एकत्र येऊन ही सेवा देत असून यामुळे भाविक भक्तांना पायदळ चालण्याचा त्रास वाचत असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या स्तुत्य उपक्रमाची चर्चा करीत आहे. यावेळी राजू गव्हाणे, लोकेश गुंडलवार, सुरज चाटे, विजू गव्हाणे, जमीर भाई, योगेश सोनवणे, सतीश गेडाम, पियुष शतपालकर, मारोती खडतकर, कपिल जुनेजा, संकेत उलमाले, आकाश नागतुरे, आकाश ढवळे, प्रीतम ऍडलावार आदी क्रांती युवा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......