WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सैन्यात वणीचे वीर चालले.... आठ !

Image

सागर मुने, वणी

मातृभूमीची आणि देशभक्तांच्या रक्षणाची प्रत्यक्ष सुवर्णसंधी म्हणजे भारतीय सैन्यदलातील निवड. वणी साठी अत्यंत अभिमानाचा विषय म्हणजे अत्यंत कष्टसाध्य असणाऱ्या विविध प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षांना पार करून वणीचे पंकज राजूरकर, सुनील विरुटकर, राम बोधनकर, भास्कर ठाकरे, गणेश किनाके, हसमुख दिधकोहळे, वैभव गौरकार आणि कैलास गोवारकर या आठ जवानांची नुकतीच भारतीय सैन्यदलात निवड करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे हे आठही विद्यार्थी येथील सुप्रसिद्ध लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना पथकातील स्वयंसेवक होते. ही बाब महाविद्यालयासाठी अलौकिक गौरवस्पद आहे. इतक्या मोठ्या संख्येने अशी निवड होण्याची ही महाविद्यालयाच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे.

शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला यांच्यासह मंडळाच्या सर्व संचालक गणांनी तथा कार्यकारी प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी या अभिमानास्पद उपलब्धी बद्दल या आठही जणांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी लेफ्टनंट प्रा. रवींद्र मत्ते यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......