WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सरकार च्या धोरणा विरोधात 21 ला राजूर येथे मानवी साखळी....

Image

राजूर :- शिक्षणाचे बाजारीकरण व बेरोजगारी वाढविणाऱ्या धोरणाविरुद्ध २१ ऑक्टोला राजूर येथे मानवी साखळी

-------–----–--–-----------

संपूर्ण महाराष्ट्रभर सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शिक्षणाचं होत असलेलं बाजारीकरण व वाढणारी बेरोजगारी याचा निषेधc करून धोरणे बदलवून सर्वांना शिक्षण सर्वांना काम ह्या मागणीला घेऊन तरुण,युवक व विद्यार्थी मानवी साखळी करीत आहेत. त्याच अनुषंगाने राजूर कॉलरी येथेही मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले आहे.

सत्तेवर आलेले केंद्र सरकार दरवर्षी २ कोटी लोकांना रोजगार देऊ म्हणून निवडणुकीत सांगत होते. दरवर्षी दीड कोटी विद्यार्थी शिक्षण घेऊन नोकरीसाठी मार्केट मध्ये येतात. त्यामुळे ह्या मोदी सरकारच्या निवडणुकीतील अश्वासनाला भाळून तरुणांनी मते दिली. परंतु गेल्या ४ वर्षात नोकऱ्या मिळणे तर दूर नोटबंदी मुळे असलेल्या नोकऱ्या सुद्धा गमावल्या आहे. उलट एफडीआय १००% केल्यामुळे येथील छोटे उद्योगधंदे व व्यवसाय बंद व्हायला लागल्याने मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढायला सुरुवात झाली असून भांडवलदारांनी नोकरी विना उत्पादन व विकास अशी व्यवस्था चालवून मनुष्यबळाचा वापर न करता रोबोट( मशीन ) द्वारे उत्पादन सुरू केल्याने असलेला रोजगार संपुष्टात आणणे सुरु केले आहे. परिणामी ह्या चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारी प्रचंड प्रमाणावर वाढायला लागली आहे. तर दुसरी कडे प्राथमिक शाळा बंद करून ज्याच्याकडे पैसे आहे तेच शिक्षण घेऊ शकतील अशी व्यवस्था रुजू करण्यासाठी शिक्षणाचं मोठ्या प्रमाणावर बाजारीकरण अर्थात खाजगीकरण करणे सुरू आहे. सरकारला रोजगारच द्यायचे नसल्याने गरिबांच्या हातून शिक्षण हिसकावून घेणे सुरु केले आहे.

या संदर्भात राजूर कॉलरी येथील राजूर विकास संघर्ष समितीने पुढाकार घेऊन सर्व संघटना, पक्ष यांना एकत्र करून ह्या प्रश्ना बद्दल चर्चा घडवून आणली व यावर मानवी साखळी करण्यावर एकमत घडले आहे. येत्या २१ ऑक्टोबरला शहीद भगतसिंग चौक ते राजीव गांधी चौक अशी मानवी साखळी करून ह्या जनविरोधी धोरणाविरुद्ध सरकार वर दबाव आणण्याचे प्रयत्न केला जाणार आहे.

राजूर येथील महिला मंडळ हॉल येथे झालेल्या मिटिंग मध्ये माकपचे कॉ कुमार मोहरमपुरी, राजूर विकास संघर्ष समितीचे जयंत कोयरे, राहुल कुंभारे, कांग्रेसचे श्रीनिवास अंधेवार,डेव्हिड पेरकावार, राजूर ग्राम विकास समितीचे अनिल डवरे , महेश लिपटे, बसपाचे पंकज कांबळे,अंकुश पेटकर, बिरसा ब्रिगेडचे लीलाधरसूर्य आरमोरीकर, सुभाष पेंदाम, मनसे चे प्रदीप बांदूरकर, सिपीआयचे नंदकिशोर लोहकरे, अक्षय गावंडे, व अन्य लोकांनी सहभाग घेऊन मानवी साखळी करण्याचे ठरविले आहे. या मानवी साखळी मध्ये परिसरातील सर्व विद्यार्थी , तरुण, युवक, युवतींनी तसेच पालकांनी सुद्धा सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......