WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पत्रकारांशी वाद घालून अपमानीत करण्ऱ्या वाहतूक पोलिसावर कडक कार्यवाही करिता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी निवेदन

Image

प्रतिनिधि सचिन मेश्राम :-

मारेगांवःयवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील दोन वाहतूक पोलीस शिपाई नितीन खांदवे, व अब्दुल कलिम यांनी दै सिंहझेप चे मारेगांव प्रतिनिधी यांचा सोबत अरेरावीची भाषा वापरून बुद्धीपरस्पर जनते समोर पत्रकाराशी वाद घालून अपमानित केले, व पत्रकाराची प्रतिष्ठा मलीन करून वर्दिचा रुबाब जनतेला दाखवन्याचे काम केलेल्याची घटना मारेगांव येथे घडली दि.१३ /०२/२०२०ला अंदाजे६:१५वाजता मार्डी चौकात आँटो चालक व सिटर गाडीच्या वाहन चालकाचा वाद सुरू होता,व लोकांची गर्दी जमली होती ही गर्दी पाहून त्याची माहिती घेण्या करिता पत्रकार पंकज नेहारे दैनिक सिहझेप व पत्रकार सचीन मेश्राम त्यांनी तिथे उपस्थित असणारे वाहतूक पोलीस कर्मचारी नितीन खांदवे व अब्दुल कलिम यांना काय झाले असे विचारले असता तुला काय कराचे आहेत- तु कोण आहेस मी तुला ओळखत नाहीत अशी अरेरावीची उत्तर दिले जेव्हा पंकज नेहारे यांनी दैनिक सिहझेपचे ओळखपत्र दाखवीले असता ते मला दाखुवू नकोस ते पत्रकार वत्रकार मी काहीच समजत नाही दैनिक सिहझेप मला माहित नाहीत व मी ते पाहिले नाहीत याचे मला काहीच लेने देने नाही असे म्हणून त्यांनी हातात असलेल्या ओळखपत्रा सहीत हात झटकुण दिला व अरेरावीची भाषा करून वाद घातला व जनते समोर वर्दिचा रुबाब दाखवून पत्रकाराचा मानभंग, प्रतिष्ठा कमी केली व अपमानित केलेत जर अशी वाहतूक पोलीस कर्मचारांची अरेरावी आमच्या पत्रकारा सोबत करण्याची हिंम्मत करू शकतात तर सर्व सामान्य माणसा सोबत कशा प्रकारची वागणूक करीत असेल याची शंका आपनच करू शकतात हा एका पत्रकाराचा अपमान नसुन आमच्या सर्वच पत्रकारांचा अपमान प्रतिष्ठा आहेत तो कोणत्याही दैनिक पेपरचा असला तरी तो आमचा आहेत ह्या अशा वागन्या मुळे वाहतूक पोलीस नितीन खांदवे, व अब्दुल कलीम यांच्यावर पत्रकार सरंक्षण कायद्या अंतर्गत कडक कार्यवाही झाली पाहिजे अन्यथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य मारेगांव तालुका संघटना व जिल्हा संघटनेने मा.श्री.उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे दरबारी तक्रार केली आहेत जर त्या वाहतूक पोलीस नितीन खांदवे, व अब्दुल कलीम यांच्यावर कडक कार्यवाही न झाल्यास पुर्ण महाराष्ट्रभर तिव्र आंदोलन करण्याचा इशारा करण्यात आला आहेत, व त्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपत्तीची चौकशीची मागणी देखील करण्यासाठी आता मा.मुख्यमंत्री महोदया कडुन पत्रकार अपेक्षा करीत आहेत.

या बाबत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य व ग्राहक प्रहार संघटना यवतमाळ आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा कडे कडक कारवाही करण्या करिता देण्यात आले आहे,

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले