WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वाघदरा येथे एका ईसमावर जिवघेना हल्ला,आरोपि बापलेकांना अटक,दोन दिवसाची पोलीस कोठडी

Image

वणी शहर प्रतिनिधी:- निलेश चौधरी

वणी शहरालगत असलेल्या वाघदरा येथे एका ईसमावर येथिलच बाप लेकांनी जिवघेना हल्ला केला असुन या हल्यात तो ईसम गंभिर जखमी झाल्याची घटना घडली असुन आरोपि बापलेकांना पोलीसांनी अटक केली असुन दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळवली आहे.

प्रमोद खुशाल जाधव (45) आणी मुलगा पंकज प्रमोद जाधव (22) दोघेही रा. वाघदरा असे आरोपिचे नाव आहे.आरोपि प्रमोद हा विठ्ठल पावडे यांच्या शेतात मजुर म्हणुन कुटार भरण्यासाठी गेला होता.या शेतात सालगडी म्हणुन सुधाकर धानफुले हा शेतकाम करित होता.काही कारणावरुन आरोपी प्रमोद जाधव व सुधारक धानफुले यांच्यात वादविवाद झाला परंतु तिथे मजूर म्हणून कामाला असलेला अशोक गेडाम यांने त्यांचा वाद मिटविला,त्यानंतर आरोपी प्रमोद हा शेतातुन घरी निघून गेला.परंतु आरोपी प्रमोदच्या मनात .

झालेला वाद खटकत होता. तो गावातच सुधाकर धानफुले यांचा मागावर दबा धरुन बसलेला होता. सायं 5:30 वाजताच्या दरम्यान सुधाकर धानफुले हा ट्रॅक्टर घेवुन गावात येत असतांना,आरोपी प्रमोद जाधव ने डाॅ.पावडे यांच्या घरासमोर वाद घातला आणी सुधाकर धानफुले यांचेवर हल्ला केला.या हल्ल्यात आरोपी प्रमोद जाधव याने ट्रॅक्टरमध्ये असलेली ,लाकडी उभारीने सुधाकरच्या ,डोक्यावर,तोंडावर मारहान करण्यास सुरवात केली.ईतक्यातच प्रमोद चा मुलगा पंकज जाधव हा घटनास्थळावर धावत आला आणी त्याने कोणताही विचार न करता सुधाकरवर विटेने बेदम मारहाण केली. यात सुधाकर हा मोठ्या प्रमाणात गंभिर जखमी झाला.यानंतर सुधाकरला गावकर्यांनी तात्काळ वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने तेथिल डांक्टरांनी सुधाकरला चंद्रपुर येथे पुढिल उपचाराकरिता रवाना केले.या घडलेल्या घटनेची तक्रार जखमी ईसमाचा मुलगा शञुघन सुधारक धानफुले(24)यांनी वणी पोलीस स्टेशन गाठुन तक्रार दिली. या तक्रारीवरुन भादंवि.307,341(34) अन्वये गुन्हा दाखल करून,आरोपि बापलेकांना पोलीसांनी ताब्यात घेतले व वणी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनीवली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......