WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

CAA : दिल्लीत हिंसाचाराचा उद्रेक; चौघांचा मृत्यू, ३७ जखमी

Image

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) धरणे देणारे आंदोलक व कायद्याला समर्थन देणाऱ्या गटामध्ये सोमवारी जोरदार धुमश्चक्री झाली. दोन्ही बाजूच्या संतप्त आंदोलकांनी तुफान दगडफेक करत दुकानं, वाहनं पेटवून दिली. यातच एकानं गोळीबारही केला. या संपुर्ण हिंसाचारात एका पोलिसांसह तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गोळीबार करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली असून, ईशान्य दिल्लीतील अनेक भागात जमाव बंदी लागू करण्यात आली आहे. दिल्लीतील मेट्रो स्टेशन परिसरात सीएए विरोधक आणि समर्थक गट समोरासमोर आले होते. यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली. एवढेच नाहीतर जाफराबाद मौजपूरी परिसरातील अनेक वाहनं देखील आंदोलकांनी पेटवून दिली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

CAR