WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

बेलदार समाजाची युवा शहर व महिला कार्यकारणी गठीत

Image

बेलदार समाजाची युवा शहर व महिला कार्यकारणी गठीत

वणी: वणी येथे बेलदार समाज बहउद्देशीय संस्था वणी अंतर्गत बेलदार समाज युवा शहर कार्यकारीणी तथा महिला कार्यकारणी निवड सभा बेलदार पुरा गणपती मंदिर येथे 22 फेब्रुवारी शनिवार व 23 फेब्रुवारी रविवार रोजी घेण्यात आली. 22 फेब्रुवारी रोजी झालेल्या बेलदार समाज युवा शहर कार्यकारणी निवड सभेचे अध्यक्ष बेलदार समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रदीप बोनगीरवार प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव पांडुरंग ताटेवार, न.प वणीचे नगरसेवक राकेश बुग्गेवार संस्थेचे सल्लागार श्रीनिवास येडलावार, आदी होते. या सभेत बेलदार समाज युवा शहर कार्यकारिणीचे अध्यक्ष म्हणून संदीप मृत्यलवार यांची निवड सर्वानुमते करण्यात आली तसेच उपाध्यक्ष महेश संगेनवार, सचिव अमोल मसेवार, प्रसिद्धी प्रमुख रोहन आदेवार, सदस्य प्रकाश कोडंमवार,स्वप्नील आयतवार, श्रीकांत पोच्चमपेल्लीवार,सुनील बोनगीरवार, अमन कुल्दीवार, सागर बरशेट्टीवार,महेश एडलावार,अजय नाईनवार,शुभम मैदमवार आदींची निवड करण्यात आली. संचालन सागर बारशेट्टीवार,प्रस्ताविक पांडुरंग तोटेवार यांनी केले तर आभार विशाल बोरकूटवार यांनी मानले.

23 फेब्रुवारी रविवार रोजी झालेल्या बेलदार समाज महिला कार्यकारणी निवड सभेचे अध्यक्ष छायाताई मंथनवार, प्रमुख पाहुणे सविताताई सिद्धमशेट्टीवार, पांडुरंग ताटेवार, संदीप मृत्यलवार आदी होते. या सभेत बेलदार समाज महिला कार्यकारणी चे अध्यक्ष म्हणुन अध्यक्ष* - सौ.अल्काताई दुधेवार, उपाध्यक्ष -सौ. रसिकाताई बेझलवार, सचिव- सौ.रेखाताई बोनगीरवार, कोषाध्यक्ष- सौ.अमृताताई कुल्दीवार तर सदस्य

सौ.प्रितीताई बोरकूटवार,सौ.वंदनाताई मुत्यलवार, सौ.सविताताई सिध्दमशेट्टीवार,सौ.नंदाताई मसेवार,सौ.शिल्पाताई बाचीकवार, सौ.वैशालीताई मारगमवार आदींची निवड करण्यात आली.

संचालन राकेश बरशेट्टीवार, प्रस्ताविक पांडुरंग ताटेवार, तर आभार गजानन चंदावार यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

---------------------

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.