WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आठवीच्या अर्थने विकसित केला फवारणी रोबोट

Image

यवतमाळ : येथील स्कूल ऑफ स्कॉलर्सचा आठवीचा विद्यार्थी अर्थ विवेक जगताप याने स्वयंचलित फवारणी रोबोट विकसित केला आहे. मोबाईलने कार्यान्वित होत असलेला हा रोबोट त्याने अत्याधुनिक तंत्राचा वापर करून तयार केला आहे.पिकांवर कीटकनाशक फवारताना शेतकरी, शेतमजुरांना संकटाला तोंड द्यावे लागते. अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. काहींची दृष्टी गेली. या बिकट प्रश्नावर उपाय शोधण्याच्या विचाराने प्रेरित होऊन अर्थने हा रोबोट तयार केला आहे.रोबोट शेतातील पिके स्वत:च लक्षात घेतो व तेव्हाच फवारणी करतो. शेतातील तापमान, जमिनीतील आर्द्रता पटलावर दाखवितो. या रोबोटचे अनेक ठिकाणच्या विज्ञान प्रदर्शनात कौतुक झाले आहे. नागपूर येथे झालेल्या सीबीएसई विज्ञान प्रदर्शनातही अर्थचा रोबोट कौतुकास पात्र ठरला आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले