WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वडिलांनेच केला 11वर्षीय मुलावर अत्याचार : समलैंगिकता व पॉक्सो अंतर्गत दोन आरोपीस अटक

Image

शहरातील मुख्य मार्केट परिसरातील रहिवासी 11 वर्षीय अल्पवयीन मुलावर त्याचे वडील व भाजीपाला मार्केट परिसरातील एका व्यावसायिकाने समलैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना काल रात्री उघडकीस आली. पीडित मुलाच्या आई च्या तक्रारीनुसार राजुरा पोलीस ठाणे येथे काल रात्री उशिरा (प्रातः सकाळी 3:30 ) वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपीस अटकेत घेतले आहे.

पीडित मुलांनी तक्रारीत केलेल्या कथन नुसार सुरुवातीला त्याचे वडील व सदर व्यापारी मुलाच्या घरीच वारंवार अत्याचार करायचे त्यानंतर आरोपी व्यापारी हा मुलाला त्याच्या व्यावसायिक गोडाऊन मध्ये नेऊन अत्याचार करायचा व कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत असल्यामुळे शारीरिक त्रास होत असला तरीही कुठेही वाच्चता केली नाही.

परंतु 25 फेब्रुवारी ला पीडित ट्युशन क्लास वरून घरी जात असताना सदर व्यापाऱ्याने बोलावून गोडाऊन मध्ये नेले व आतून दार लावून कुकर्म केले असा त्याचा आरोप असून वृत्त लिहेपर्यंत अपराध क्रमांक 0160/2029 -भादंवि 377, 506 व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 (पोकसो ऍक्ट ) - 10, 3, 7, 6 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात येऊन पिडीतास वैद्यकीय तपासणीकरिता रवाना करण्यात आले होते.

घटनेचा अधिक तपास राजुरा पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार नरेंद्र कोसूरकर करीत आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

CAR