WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

एकाच रुळावर आल्या दोन रेल्वेगाड्या, अपघातात 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

Image

मध्य प्रदेशच्या सिंगरोली जिल्ह्यात दोन रेल्वे मालगाडीची समोरासमोर धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच, पोलीस प्रशासन आणि रेल्वेतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धावे घेतली आहे. तसेच, तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. एनटीपीसीच्या कोळसा वाहून नेणाऱ्या दोन मालगाड्यांची टक्कर झाल्याने ही दुर्घटना घडली. बैढन ठाणा क्षेत्रातील रिहन्द नगर येथून एक मालगाडी कोळसा वाहून नेत होती. तर, दुसऱ्या दिशेने रिकामा मालगाडी येत होती. या दोन्ही मालगाड्यांची समोरासमोर धडक बसल्याने दोन्ही गाड्यांचे डब्बे रुळावरुन घसरले आहेत. या रेल्वेगाडीत अडकून 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच हा भीषण अपघात झाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या मार्गावर पहिल्यांदाच रेल्वे अपघात झाला आहे. ", "articleBody":"भोपाळ - मध्य प्रदेशच्या सिंगरोली जिल्ह्यात दोन रेल्वे मालगाडीची समोरासमोर धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच, पोलीस प्रशासन आणि रेल्वेतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धावे घेतली आहे. तसेच, तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. एनटीपीसीच्या कोळसा वाहून नेणाऱ्या दोन मालगाड्यांची टक्कर झाल्याने ही दुर्घटना घडली. बैढन ठाणा क्षेत्रातील रिहन्द नगर येथून एक मालगाडी कोळसा वाहून नेत होती. तर, दुसऱ्या दिशेने रिकामा मालगाडी येत होती. या दोन्ही मालगाड्यांची समोरासमोर धडक बसल्याने दोन्ही गाड्यांचे डब्बे रुळावरुन घसरले आहेत. या रेल्वेगाडीत अडकून 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच हा भीषण अपघात झाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या मार्गावर पहिल्यांदाच रेल्वे अपघात झाला आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले