WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

रंगनाथ स्वामी मंदिराला पर्यटन स्थळाचे स्थान द्या....विक्रांत चचडा...

Image

पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन सादर....

वणी :- सुरज चाटे, तालुका प्रतिनिधी

वणी ही सांस्कृतिक तसेच धार्मिक नगरी म्हणून सर्वत्र परिचित आहे त्यामुळे वणीचे आराध्य दैवत श्री रंगनाथ स्वामी यांचे मंदिर देखील भाविकांच्या मनातील एक माहेरघर आहे. या देवस्थानाला पर्यटन स्थळाचा दर्जा द्यावा असा जोर नुकताच युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रांत चाचडा यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

श्री रंगनाथ स्वामी परिसर हा मंदिराच्या नावाने सर्वत्र परिचित आहे, मंदिरात नित्यनियमाने त्याचे विश्वस्त मंडळ काम पाहतात त्यामुळे जर मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला तर परिसरातील पिछाडलेला भाग तथा परिसर नावारूपास येईल. वणीचे आराध्य दैवत श्री रंगनाथ स्वामी देवस्थान हेमाळपंथी प्राचीन असून या देवस्थानाची नित्यनियमाने कामे व सामाजिक दृष्टी व बांधिलकी जमून सामाजिक एकता निर्माण करणारे धार्मिक कार्यक्रम सुरू असते. हे देवस्थान बऱ्याच कालावधी पासून आहे, याला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाल्यास पिछाडलेल्या परिसराला एक उच्च दर्जाचे स्वरूप मिळणार या दृष्टिकोनातून शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनात युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रांत चचडा यांनी पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विश्वासू रुपेश कदम यांच्याकडे सेनाभवन येथे प्रस्ताव दिला व त्यांनी या विषयी त्वरित कार्यवाही करण्याची हमी व आश्वासन दिलेल्या निवेदनातून केले आहे.

या मंदिराला महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या यादीत प्रसिद्धी मिळाल्यास येथे पर्यटकांची रेलचेल वाढून मंदिराच्या जिर्णोद्धार करण्यास मदत मिळेल याच हेतून येथील युवा वर्ग आता जोमाने कामाला लागले असल्याचे सुद्धा दिसत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.