WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जियाची थायलंड मधे भरारी

Image

सागर मुने,वणी

पांढरकवडा येथील जिया रोशन लोखंडे ही रिसोडच्या लायसीयम इंग्लीश स्कुल मधील युकेजी ची विद्यार्थीनी प्रत्येक विद्यार्थ्यामधे काही ना काही सुप्त गुण असताता तशीच जियाला सुद्धा शास्त्रीय नृत्याची आवड होती. जियाने आजवर अनेक स्पर्धेत भाग घेऊन बक्षीसे प्राप्त केली आहेत. मध्यप्रदेश मधील रतलाम येथे पार पडलेल्या सातव्या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत जियाने प्रथम क्रमांक पटकविला होता तसेच वयाच्या चौथ्या वर्षी तिने मीस विदर्भ बेस्ट पर्सनॅलीटी अवार्ड २०१८ इन ज्युनीअर कॅटॅगीरी मधेही यश प्राप्त केले. अलीकडे भुटान येथे पार पडलेल्या पहील्या दक्षीण आशीयाई नृत्य स्पर्धा २०१९ मधे तिने बांग्लादेश, भुटान, नेपाळ येथील स्पर्धकांवर मात करीत यश संपादन केले. तसेच यवतमाळ येथे झालेल्या सौदर्य स्पर्धेसह बुध्दीमत्तेतही जिया अव्वल आली. संपुर्ण महाराष्ट्रातुन आलेल्या स्पर्धकात जियाने बाजी मारली. जिया लोखंडे हिने स्वत:ला सिद्ध करण्याची जिद्य, आणि त्याला आत्मविश्वासाची जोड, आपली मोहक अदा, हास्य, तसेच आत्मविश्वासाने रॅम्पवर केलेल्या कॅटवॉकने उपस्थितांची मने जिंकली.

जियानी मॉडेल आॅफ द ईयर किड्स मीस महाराष्ट्र २०१९ चा किताब स्वत:च्या नावावर कोरला. प्रत्येक फेरीत जियाने आपल्या बुध्दीकौशल्याने आपल्या टॅलेंट राउंडमधील परीक्षकांची मने जिंकली. मागील वर्षी वर्धा येथे झालेल्या विदर्भ सौदर्य स्पर्धेत मिस विर्दभ बेस्ट पर्सनॅलीटी पुरस्कार मिळविला होता. थायलंड येथे एप्रील २०२० मधे होणाऱ्या डान्स फेस्टीवल मधे जियाची निवड झाली आहे. ती या नृत्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. जियाला मॉडेलींग व नृत्याची प्रचंड आवड आहे. त्यामुळे जिया नक्कीच भारताचे नाव देशाबाहेरही रोशन करेलच अशी खात्री आहे. त्यामुळे सर्व स्तरावरून जियाचे कौतुक होत आहे.

जिड्डेवार रंगमंच पांढरकवडा येथे शिवजयंती निमीत्य नुकतीच भव्य नृत्य स्पर्धा घेण्यात आली होती तिथेही जियाला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले व थायलंड येथे होणाऱ्या डान्स फेस्टीवल करीता भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या. जियाने आपल्या यशाचे श्रेय आई मनीषा लोखंडे, वडील रोशन लोखंडे, गुरू सचिन डंभारे व रोहीत गांधी यांना दिले आहे. या सर्वाच्या योग्य मार्गदर्शनामुळे मला उंच भरारी घेण्याचे बळ प्राप्त झाले, अशी प्रतिक्रिया चिमुकल्या जियाने व्यक्त केली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.