WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

धानोरा येथील नायब तहसीलदार अडकला एसीबीच्या जाळ्यात

Image

कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्य खरेदीच्या कामाकरिता सालवंसी तयार करुन देण्यासाठी १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज, २ मार्च २०२० रोजी धानोरा येथील तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार दीपक शिवचरण भैसारे (५६) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे लाचखोर अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर असे की, तक्रारकर्ता हा धानोरा येथील रहिवासी असून तो कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्य खरेदी-विक्रीचे काम करतो. त्यासाठी त्याला सालवंसीची गरज होती. ती प्राप्त करण्यासाठी त्याने तहसील कार्यालयात रीतसर अर्ज केला होता. परंतु सालवंसी तयार करुन देण्यासाठी नायब तहसीलदार दीपक भैसारे याने तक्रारकर्त्यास १ हजार रुपये लाच रक्कमेची मागणी केली. परंतु लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार आज दुपारी या विभागाच्या अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालय परिसरात सापळा रचला. दरम्यान, नायब तहसीलदार दीपक भैसारे यास तक्रारकर्त्याकडून १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (संशोधन २०१९)  नुसार धानोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरच्या पोलिस अधीक्षक श्रीमती रश्मी नांदेडकर, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार, पोलिस उपअधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक रवी राजुलवार, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, हवालदार प्रमोद ढोरे, नथ्थू  धोटे, शिपाई सतीश कत्तीवार, सुधाकर दंडिकवार, देवेंद्र लोनबले, गणेश वासेकर, किशोर ठाकूर, महेश कुकुडकार, घनश्याम वडेट्टीवार, सोनल आत्राम, सोनी तावाडे यांनी ही कारवाई केली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......