WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी भाल्लर मार्गावर अपघात? ..... एक ठार, एक गंभीर

Image

सुरज चाटे वणी :- वणी भाल्लर या मार्गावर काल दिनांक 20 ला सायंकाळी 9.10 वाजताच्या दरम्यान दोन दुचाकी आपसात एकमेकांना भिडल्या त्यात एक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

वणी भाल्लर मार्ग हा सारखा वर्दळीचा मार्ग मनून ओळखल्या जातो त्याचप्रमाणे या मार्गाने रात्री सुद्धा आदी वाहनांची मोठी वर्दळ असते त्यातच दिनांक 20 ला सायंकाळी 9 वाजताच्या दरम्यान स्प्लेनडेर ही दुचाकी भाल्लर कॉलनी कडे जात होती व बजाज चॅम्पियन भाल्लर कॉलनी कडून भाल्लर च्या दिशेला येत होती अशा दोन दुचाकी एकमेकांना भिडल्या त्यात निकेश बावणे हा जागीच ठार झाला तर रामदास पोतराजे हा गंभीर असून त्याला तात्काळ उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले, त्यावर उपचार सुरू आहे, परिसरात घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती, मृत्यूचे कारण अजून तरी स्पष्ट नसून नेमका अपघात झाला कसा? असा तर्क वितर्क लावल्या जात आहे. दोनही दुचाकी धारक भाल्लर गावचेच आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

CAR