WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मानवी साखळीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Image

  • सर्वांना शिक्षण व सर्वांना रोजगार देण्यात यावे
  • राजूर येथे झालेल्या मानवी साखळीची मागणी
  • सर्व पक्ष व संघटनांनी घेतला मानवी साखळीत सहभाग
  • राजूर कॉलरी : शिक्षणाचे बाजारीकरण अर्थात खाजगीकरण व बेरोजगारी वाढविणाऱ्या धोरणाविरुद्ध तसेच सर्वांना शिक्षण, सर्वांना रोजगार ह्या प्रमुख मागणीला घेऊन येथील सर्व पक्ष व संघटनांनी शहीद भगतसिंग चौक ते राजीव गांधी चौक अशी मानवी साखळी करण्यात आली.

    शिक्षणावरील खर्च शासनाने कमी केला. खासगीशाळांना परवानगी देऊन सरकारी शाळा कमकुवत केल्या. शिक्षकांना शिकविण्याव्यतिरिक्त कामे देऊन शिक्षणाची गुणवत्ता संपविली. परिणामी सरकारी शाळा ओस पाडण्याचा आणि पर्यायी बंद करण्याच्या निर्णय प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी घेतला असून हा निर्णय ह्या देशातील बहुजन जनतेच्या हिता विरुद्ध असून धनदांडग्या शिक्षण सम्राटांना लुटण्याचे दारे मोकळी करून देऊन गरिबांपासून शिक्षणच दूर करण्याचे भयानक षडयंत्र आहे. दुसरीकडे भांडवलदारांना सर्व सवलती देऊन प्रचंड मनुष्यबळ असतानाही त्यांना रोबोट मशिनद्वारे उत्पादन करण्याची तसेच कामाचे तास ८चे १२ तास करून मजुरांना लुटण्याची मोकळीक देऊन बेरोजगारी वाढविण्याचे व त्या अनुषंगाने वेतन कमी ठेऊन कामगार व बेरोजगारांना ठगण्याचे धोरण सुरु केले आहे. सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण करणे, कंत्राटीकरण करून स्थायी रोजगार न देणे, हे सर्व बेरोजगारित वाढ करण्याचे धोरणे आहेत. करिता राजूर येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कांग्रेस पक्ष, बहुजन समाज पक्ष, मनसे, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, बिरसा ब्रिगेड, राजूर विकास संघर्ष समिती व ग्राम विकास समिती आदींनी मानवी साखळीचे आयोजन केले होते. हि मानवी साखळी राजूर येथील शहिंद भगतसिंग चौक ते राजीव गांधी अशी करण्यात आली. ह्या मानवी साखळीत गावातील आशा वर्कर व गावकऱ्यांनी चांगला उस्फुर्त सहभाग घेतला.

    मानवी साखळीचा अनुषंगाने शहीद भगत सिंग चौक व राजीव गांधी चौक ह्या दोन्ही ठिकाणी सभा घेऊन जनविरोधी धोरणाचा निषेध करून विरोध करण्यात आला. ह्या सभेला माकपचे कॉ शंकरराव दानव, कॉ कुमार मोहरमपुरी, प्रवीण खानझोडे, लिलाधरसूर्य आरमोरीकर, राहुल कुंभारे, संतोष भादीकर,महेश लिपटे आदींनी संबोधित करून मार्गदर्शन केले.

    ह्या मानवी साखळी ला श्रीनिवास अंधेवार, डेव्हिड पेरकावार, अनिल डवरे,अजय कंडेवार, नंदकिशोर लोहकरे,अंकुश पेटकर,जयंत कोयरे, राज प्रजापती,पंकज कांबळे,सुभाष पेंदाम, बंडू कांबळे, सरोज मुन,प्रदीप बांदूरकर, संजय पिसे, समय्या कोंकटवार, अरविंद सिडाम, नंदकिशोर मुन, सागर नगराळे, अशोक बाभळे, रामलु बोलगमवार , नजीर अली, सुनीता कुंभारे, अर्चना कडूकर, सरोज वरपटकर, सुकेशनी धाबर्डे,शीतल धोटे आदींनी प्रामुख्याने सहभाग घेतला. मानवी साखळीत प्रत्येकांनी मागण्यांचे फलक शरीरावर लावले होते व प्रचंड घोषणाही देण्यात आल्या.

    वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



    share


    Image

    धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले