WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

दहावीची परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याचा खून

Image

दहावीची परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या १७ वर्षाच्या मुलावर चाकूने प्राणघातक हल्ला करून त्याचा खून केल्याची घटना ३ मार्चच्या सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गोंदिया तालुक्याच्या मोरवाही येथे घडली. अतुल अशोक तरोणे (१७) रा.मोरवाही असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. मंगळवारी दहावीचा मराठीचा पेपर असल्याने तो पेपर देण्यासाठी गेला होता. पेपर देऊन घरी परतत असताना त्याला त्याच्या घरापासून ४०० ते ५०० मीटर अंतरावर असलेल्या एका गव्हाच्या शेतात त्याच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्याच्या डोक्यावर, शरीरावर चाकूचे घाव मारले. या घटनेची वाच्यता त्याने कुणाकडे करू नये म्हणून त्याची जीभही कापण्यात आली आहे. रक्ताच्या थारोळ््यात पडलेल्या त्या मुलाला उपचारासाठी गोंदियाच्या एका खासगी रूग्णालयात नेण्यात आले होते. परंतु उपचारही कामी आला नाही. सायंकाळी ७.३० वाजता त्याचा मृत्यू झाल्याने त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यासाठी त्याला गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आले. जुन्या वैनमस्यातून त्याचा खून झाल्याची चर्चा गावात होती. परंतु मारेकरी कोण याची माहिती मिळू शकली नाही. सदर घटनेसंदर्भात गोंदिया ग्रामीण पोलिसांनी रात्री उशीरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.