WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

राज ठाकरेंचा वणीमध्ये कार्यकर्ता मेळावा

Image

सुरज चाटे वणी :- राज ठाकरेंच्या आगमनार्थ मोठ्या प्रमाणात राज प्रेमींची उपस्थिती

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱयावर आहेत. त्यांचे आज दुपारी दिनांक 22 ला यवतमाळ जिल्ह्यातील वणीमध्ये आगमन झाले. वसंत जिनींग लॉनवर मनसेचा कार्यकर्ता मेळावा झाला,

मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी राज ठाकरेंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 'मी फक्त तुमच्या भेटीसाठी आलो असून येत्या जानेवारी महिन्यात वणीमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सभा घेईन,' असे राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले, वणी तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी वणी येथील शिवाजी चौकात मोठी गर्दी केली होती. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत राज ठाकरेंचे स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे आमदार बाळा नांदगावकर, मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, आनंद एंबडवार, अनिल गडकरी, अनिल गडम तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर राज ठाकरे कार्यकर्ता मेळाव्यासाठी वसंत जिनिंग लॉनवर गेले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.