WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

२१५ भारतीय इटलीच्या करोना बाधित पर्यटकांच्या संपर्कात आले, राजस्थान सरकारची माहिती

Image

इटलीमधून भारतात आलेल्या पर्यटकांना करोना व्हायरसची लागण झाली असल्याचं निष्पन्न झाली असून हे सर्व पर्यटक २१५ भारतीयांच्या संपर्कात आले होते. राजस्थानचे आरोग्यमंत्री रघु शर्मा यांनी सभागृहात ही माहिती दिली आहे. हे सर्व पर्यटक राज्यात फिरण्यासाठी आले होते तेव्हा जवळपास २१५ जणांच्या संपर्कात आले असं यावेळी त्यांनी सांगितलं.

इटलीहून आलेल्या पर्यटकांच्या ग्रुपमधील १६ जणांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये एका भारतीय नागरिकाचा समावेश आहे. हा भारतीय त्यांचा टुरिस्ट गाइड म्हणून काम करत होता. या सर्वांना आयटीबीपीच्या कॅम्पमध्ये ठेवण्यात आलं आहे अशी माहिती देण्यात आली आहे.

भारतात करोनाचे एकूण २८ रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे. सध्या करोना व्हायरसंबंधी देशात काय स्थिती आहे यासंबंधी हर्षवर्धन यांनी सविस्तर माहिती दिली. राजधानी दिल्लीत करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढली तर तयारीच्या दृष्टीकोनातून रुग्णालयांना चांगल्या दर्जाचे स्वतंत्र वॉर्ड स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती यावेळी हर्षवर्धन यांनी दिली.

दिल्लीमधील प्रकरणात आम्हाला माहिती मिळाली आहे की, पीडित जवळपास ६६ लोकांच्या संपर्कात आला होता. आग्रा येथे राहणाऱ्या त्याच्या कुटुंबातील सहा जणांना करोनाची लागण झाली असल्याची निष्पन्न झालं आहे. तसंच तेलंगणामधील प्रकरणीत पीडित ८८ लोकांच्या संपर्कात आला होता अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. दरम्यान देशभरात एकूण २८ जणांना करोनाची लागण झाली असून यामधील तिघांवर उपचार करण्यात आले असून त्यांच्यात सुधारणा झाली असल्याचं यावेळी हर्षवर्धन यांनी सांगितलं.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......