WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वाहतूक पोलिसांनी रिक्षावाल्यांसमोरच केली शेकडो हेडफोन्सची होळी

Image

कानामध्ये हेडफोन्स घालून गाडी चालवणे धोकादायक ठरु शकते. अनेकदा गाडी चालवताना गाणी ऐकत असताना आजूबाजूच्या गोष्टींचा अंदाज घेणे कठीण होतं अन् अपघात होण्याची शक्यता असते. हेडफोन्स घालून गाड्या चालवणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र भारतामध्ये हेडफोन्स घालून भरधाव वेगाने गाड्या चालवणाऱ्यांचे प्रमाण काही कमी नाही. अगदी दुचाकी, चारचाकी असो किंवा रिक्षा अनेक चालक कानामध्ये हेडफोन्स टाकून गाड्या चालवताना दिसतात. मात्र मीरा रोडमधील रिक्षा चालकांना अशाप्रकारे हेडफोन्स घालून रिक्षा चालवणे जास्तच महागात पडले आहे. येथील पोलिसांनी हेडफोन्स घालून गाड्या चालवणाऱ्या रिक्षावाल्यांचे हेडफोन्स जप्त करुन ते जाळले आहेत.

मीरा रोडमधील वाहतूक पोलिसांनी हेडफोन्स घालून रिक्षा चालवणाऱ्यांविरोधात मागील काही दिवसांपासून एक मोहीम राबवली होती. हेडफोन्स घालून रिक्षा चालवणाऱ्यांना दंड करुन त्यांचे हेडफोन्स जप्त करण्यास पोलिसांनी सुरुवात केली. काही दिवसांमध्ये पोलिसांकडे अनेक हेडफोन्स गोळा झाले. रिक्षावाल्यांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांनी नंतर या सर्व हेडफोन्सची रिक्षावाल्यांसमोरच होळी केली. वाहन चालवताना हेडफोन्स घालू नका असे अनेकदा प्रबोधन करुन झाल्यानंतरही रिक्षावाल्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अनेकदा सांगूनही रिक्षावाले ऐकत नसल्याने थेट हेडफोन्स जप्त करुन त्यांची होळी करण्याचा निर्णय पोलिसांना नाइलाजास्तव घ्यावा लागला.

पोलिसांनी राबवलेल्या या हेडफोन्सविरोधी मोहिमेचा व्हिडिओ आता सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस हेडफोन्स घालून रिक्षा चालवणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करताना दिसत आहेत. त्यानंतर गोळा केलेले हेडफोन्स पोलिसांनी जाळून टाकल्याचेही व्हिडिओच्या शेवटी दिसते. अर्थात याने वायू प्रदुषण झालं असलं तरी रिक्षाचालकांविरोधात कायदा समजवून सांगण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले