WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

दिल्ली हिंसाचार: IB कर्मचाऱ्याच्या हत्या प्रकरणात फरार नगरसेवक ताहिर हुसैनला अटक

Image

दिल्ली न्यायालयाने गुरुवारी आम आदमी पार्टीचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसैनची आत्मसमर्पणाची याचिका फेटाळल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याला लगेचच अटक केली. इंटेलिजन्स ब्युरोमध्ये काम करणाऱ्या अंकित शर्माच्या हत्या प्रकरणात ताहिर हुसैन आरोपी आहे. ताहिर हुसैनने दिलासा देण्याची मागणी केली होती. पण ते न्यायालयाच्या अवाक्याबाहेर आहे असे स्पष्ट करत अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी विशाल पाहुजा यांनी हुसैनची याचिका फेटाळून लावली.

न्यायालायने ताहिर हुसैनची याचिका फेटाळल्यानंतर आधीपासून तिथे हजर असलेल्या दिल्ली पोलिसांच्या पथकाने लगेच त्याला अटक केली. तपासामध्ये सहकार्य करायचे असून, त्यासाठी आपल्याला आत्मसमर्पण करायचे आहे असे त्याने याचिकेत म्हटले होते. हुसैनच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे त्याला आत्मसमर्पण याचिका दाखल करावी लागली असा युक्तीवाद त्याचे वकिल मुकेश कालिया यांनी कोर्टासमोर केला.

मागच्या आठवडयात उत्तर-पूर्व दिल्लीत झालेल्या हिंसाचारात आयबीमध्ये काम करणाऱ्या अंकित शर्माची हत्या झाली होती. या प्रकरणात आरोपींमध्ये ताहिर हुसैनचे नाव आहे. या हिंसाचारात ४२ जणांचा मृत्यू झाला. २०० जण जखमी झाले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले