WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

धक्कादायक! दुचाकीची चावी न दिल्यानं मुलानं केली वडिलांची हत्या

Image

दुचाकीची चावीन दिल्यानं मुलानं वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना भंडाऱ्यात घडली आहे. वडिलांची हत्या केल्यानंतर मुलानं पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं. त्याला पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातल्या केशलवाडा वाघ गावात राहणाऱ्या 21 वर्षीय लोकेश टिचकुलेचे वडिलांसोबत वारंवार वाद व्हायचे. आज वडील ताराचंद टिचकुले शेतावरुन परतल्यानंतर लोकेशनं त्यांच्याकडे दुचाकीची चावी मागितली. मात्र वडिलांनी चावी देण्यास नकार दिला. यानंतर दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. ताराचंद यांनी लोकेशला काठीनं मारहाण केली. याचा राग आल्यानं लोकेशनं त्याच काठीनं वडिलांवर हल्ला चढवला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर लोकेशनं पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं. ",

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले