WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

"विषमतेला मारक क्रांतीज्योती सवित्रीमाईची कृती…"

Image

● राजूर येथील स्मृतिदिन अभिवादन कार्यक्रमात उपस्थितांचे मनोगत

--------------------------

राजूर कॉलरी : होळी च्या धुलीवंदनाच्या सणात विस्मृतीत गेलेल्या क्रांतीज्योती सवित्रीमाईच्या स्मृतिदिनाला वणी येथून जवळच असलेल्या राजूर कॉलरी या ठिकाणी १० मार्च या दिवशी क्रांतीज्योती सावित्रीबाई चौकात त्यांना गावकऱ्यांकडून अभिवादनाच्या कार्यक्रम घेण्यात आला.

एके काळी धर्माचे नियमानुसार शूद्र व महिलांना शिक्षणापासून नाकारलेल्या व्यवस्थेला महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या दाम्पत्यांनी हादरा देऊन नवीन व्यवस्थेला सुरुवात केली. पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून वंचित ठरलेल्या शूद्र व महिलांना शिक्षण देऊन देशात विकासाची, स्वातंत्र्याची व परिवर्तनाची नवीन बीजे रोवली, ज्यामुळे आज आपल्या देशात महिला व शूद्र शिक्षण घेऊन देशाच्या विकासाला हातभारच नाहीतर मोठं मोठी पदे भूषवित देशाचे नाव रोशन करीत आहेत. म्हणजेच शूद्र व महिलांना शिक्षणापासून रोखून जी विषमता या देशात राबविली जात होती त्याला हादरा देत नवीन समतेची वाट मोकळी करीत अधिकाराची जाणीव निर्माण करणारे शस्त्र हातात दिले आहे. त्याचाच वापर करीत लोकशाही ची बळकटी करीत आहेत व या देशात लोकशाही जिवंत ठेवत आहेत असे प्रतिपादन या प्रसंगी उपस्थित वक्त्यांनी व्यक्त केले.

या सावित्रीमाई स्मृतिदिन कार्यक्रमात माकपचे कॉ कुमार मोहरमपुरी, डॉ. प्रशिक बरडे, गावचे पोलीस पाटील सरोज मून, महेश लिपटे सर, कवी-गायक व तबला वादक राजेंद्र पुडके, गायक नागो खिल्लारे, पेंटर ज्ञानेश्वर तेलंग आदींनी आपले विचार व्यक्त केले.

या प्रसंगी सुभाष जाधव, जगदीश पाटील, सुधीर तोडकर, मारोती वाघमारे, पंकज चदनखेडे, किशोर आत्राम, शंकर, जय मेश्राम, रवी मेश्राम, शकील कुरेशी, बहादे आदी उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share