WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आईच्या खुनात मुलाला जन्मठेप

Image

यवतमाळ : गोधनी मार्गावरील गुरुनानकनगरात दोन वर्षापूर्वी दारूड्या मुलाने भरदुपारी आईचा डोक्यात खलबत्ता टाकून खून केला. या नराधमाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर पेटकर यांनी बुधवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

कैलाश नारायणराव उईके असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने २ सप्टेंबर २०१८ रोजी भाऊ व वडील घराबाहेर गेले असताना आई शांताबाई सोबत वाद घातला. त्याने आईला दारूसाठी पैसे मागितले. शांताबाईने पैसे देण्यास नकार देताच आरोपीने रागाच्या भरात घरातील खलबत्ता उचलून शांताबाईच्या डोक्यात घातला. रक्तस्राव होऊन शांताबाईचा जागीच मृत्यू झाला. हा संपूर्ण प्रकार चेतना मंगेश उईके यांनी पाहिला. मदतीसाठी आरडाओरडा करताच आरोपी कैलाशने घरातून पळ काढला.

या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक अमोल बारापात्रे व संदीप मुपडे यांनी या गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर आर. पेटकर यांनी या खटल्यात एकूण सहा साक्षीदार तपासले. यामध्ये फिर्यादी शेजारी राहणारी महिला, डॉक्टर यांची साक्ष ग्राह्य धरुन आरोपीला जन्मठेप व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाचे वकील अरुण ए. मोहोड यांनी फिर्यादीची बाजू मांडली. त्यांना पैरवी अधिकारी दिनकर चौधरी यांनी सहकार्य केले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share