WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

'ही' अट मान्य असेल तरच IPL खेळवा, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा BCCI ला धक्का

Image

इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) आणि देशात होणाऱ्या अन्य महत्त्वांच्या स्पर्धांबाबत केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं गुरुवारी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020 ) आणि देशात होणाऱ्या अन्य महत्त्वांच्या स्पर्धांबाबत केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं गुरुवारी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर क्रीडा मंत्रालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळासह ( बीसीसीआय ) देशातील सर्व राष्ट्रीय क्रीडा संघटनांना सूचना केल्या आहेत. त्यानुसार कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी स्पर्धा घेताना त्या बंद स्टेडिमयवर म्हणजेच प्रेक्षकांविनाच घ्या असे आदेश क्रीडा मंत्रालयाने दिले आहेत. त्यामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा ही बंद दरवाजात होईल.

IANS या वृत्तसंस्थेशी बोलताना केंद्रीय क्रीडा सचिव राधेश्याम जुलानिया यांनी सांगितले की,जर एखादी स्पर्धा प्रेक्षकांविना खेळवता येत असेल तरच त्याचे आयोजन करा. तेथे अधिकाधिक लोकं जमणार नाही याची काळजी घ्या.बीसीसीआय योग्य ती काळजी घेईल, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं IANSला सांगितले. ते खेळाच्या, खेळाडूंच्या, चाहत्यांच्या आणि लीगच्या दृष्टीनं योग्य तो निर्णय घेतला जाईल. सध्याच्या परिस्थितीवर बीसीसीआयचे नियंत्रण नाही.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share