WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आ.बोदकुरवार यांनी सभागृहात उपस्थित केला स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत प्रश्न .....

Image

सागर मुने, वणी

वणी विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कोळशाच्या खाणी आहेत. या खाणीच्या उत्खननासाठी व माती उचलण्यासाठी खाजगी कंत्राटदारांना काम दिले आहे. सदर कंत्राटदार त्यांच्या संपर्कातील परप्रांतीय कामगारांना कामावर घेत असल्यामुळे स्थानिक युवकांच्या रोजगाराचा प्रश्न औचित्याचा मुद्द्याद्वारे सभागृहात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी काल हा प्रश्न विधानसभेत मांडून सरकारला धारेवर धरले आहे.

वणी विधानसभा क्षेत्रात वेस्टर्न कोलफील्ड च्या कोळशाच्या खदानी मोठ्या प्रमाणावर आहेत. यातील कोळसा उत्खननासाठी व माती उचलण्यासाठी निविदा काढून खाजगी कंत्राटदारांना काम दिले आहे. येथील सर्व खाजगी कंत्राटदार परप्रांतीय आहेत. त्यांनी उभा कामावर सर्व परप्रांतीय कामगारांना कामावर लावले आहे. त्यामुळे स्थानिक बेरोजगार युवकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक युवकांमध्ये बेरोजगारीमुळे प्रचंड असंतोष खदखदत आहे. शासन निर्णयानुसार 80 टक्के स्थानिकांना रोजगार देणे आवश्यक वेकोलो मध्ये कार्यरत परप्रांतीय खाजगी कंपन्या स्थानिक युवकांना डावलून परप्रांतीय युवकांना प्राधान्य देत आहे. यावर शासनाच्या कोणत्याही विभागाचे वर्चस्व नाही. या परप्रांतीयांची पोलीसाकडून पडताळणी सुद्धा केल्या जात नाही.

शासन निर्णयानुसार 80 टक्के रोजगार स्थानिक युवकांना देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यामार्फत निर्देश देण्यात यावे व स्थानिक युवकांना प्राधान्य न देणाऱ्या वेकोली अंतर्गत काम करणाऱ्या खाजगी कंपन्यांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आ. बोदकुरवार यांनी केली. या प्रश्नावर मा. सभापतींनी उद्योग मंत्र्यांना लेखी उत्तर देण्याचे निर्देश दिले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share