WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शिंदोला माईन्स येथे खाण पर्यावरण व खनिज संरक्षण सप्ताह साजरा....

Image

सागर मुने -

भारतीय खाण ब्युरो , नागपूर यांच्या अंतर्गत acc सिमेंट शिंदोला माईन्स च्या भव्य पटांगणात खाण पर्यावरण व खनिज संरक्षण 31 वा सप्ताह कार्यक्रम थाटात संपन्न झाला. समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष acc सिमेंट प्लांट चे मुख्य के. वामशिधर रेड्डी होते. प्रमुख अतिथी खाणं मंत्रालयाच्या भारतीय खाण ब्युरो, कंट्रोलर जनरल व डायरेक्टर इंदिरा रवींद्रन, मुख्य खाण नियंत्रक पी. एन. शर्मा , नागपूरचे क्षेत्रीय खाण नियंत्रक अभय अग्रवाल, acc जनरल मॅनेजर सुरेश वांढरे, माणिकगढ सिमेंटचे युनिट हेड राजेंद्र काबरा, भारतीय खाण ब्युरो चंदरेश बोहरा यांची उपस्थिती होती.

शाळेच्या विद्यार्थीनि बँड पथकाने स्वागत केले. त्यांनी असलेल्या विविध स्टॉल ची पाहणी करून माहिती घेतली व मार्गदर्शन केले. सर्व अधिकारी व कर्मचारी यांना खाण पर्यावरण व खनिज संरक्षण बाबत शपथ देण्यात आली. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

या कार्यक्रमता इंदिरा रवींद्रन म्हणाल्या ड्रोन सर्व्ह द्वारे बेकायदेशीर आळा घालणे, योग्य माहिती द्वारे खनिजांचे योग्य मापन करणे आवश्यक आहे. पर्यावरनाची हानी होऊ नये यासाठी सर्व खाण मालक व कर्मचारी यांनी कार्य करणे आवश्यक आहे.

समारोपीय कार्यक्रमामध्ये विविध खाणींना, खाण पर्यावरण व खनिज संरक्षण सप्ताहात उत्कृष्ट कार्य बद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. Acc सिमेंट शिंदोला लाईम स्टोन माईन्स ला मेकॅनाईज कॅटॅगिरी मध्ये सर्व कार्यत उत्कृष्ट सादरीकरणाचा प्रथम पुरस्कार मिळाला. यावेळी सर्व खाणीचे मालक , सर्व सिमेंट प्लांटचे युनिट हेड तसेच भारतीय खाण ब्युरो चे आशिष मिश्रा, कलमार ,अन्य अधिकारी व कामगार उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share