WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

Image

शिरपुर पोलीस स्टेशन हददीतील नायगांव (बुद्रुक) येथे वास्तव्यास असलेल्या सात वर्षीय चिमुकलीवर गावातीलच एका 39 वर्षीय नराधमाने लैगिंक अत्याचार केल्याची घटना दि. 18 मार्च ला दुपारी 12 वाजता घडली. तक्रारीअंती शिरपूर पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे. आरोपीचे नांव कवडू दौलत बोबडे असे असून तो गवंडी काम करतो.

आरोपी कवडू बोबडे (39) हा घटनेच्या दिवशी दुपारी 12 वाजताच्या सुमारास बालिकेच्या घरा लगतच मिस्त्री काम करीत होता. शाळेला सुट्टी असल्यामुळे इयत्ता दुसरीत शिकणारी बालिका घरी एकटीच होती तर तिचे आई वडील कामा निमित्त बाहेर गेले होते. संधीच्या शोधात असलेल्या नराधमाने पाणी पिण्याचा बहाणा करीत बालिकेला पाणी मागीतले तिने पाणी आणून देताच तीला उचलून लगतच असलेल्या स्नानगृहात नेले आणि लैगिंक अत्याचार केला. यानंतर आरोपीने काही वेळातच पळ काढला.

घडलेल्या या भयावह प्रकाराने बालिका प्रचंड घाबरली. सायंकाळी आई वडील घरी परतताच तिने ओटीपोटा जवळ दुखत असल्याचे सांगितले. तिला तातडीने घुग्गूस येथील डॉक्टरांना दाखविले असता चंद्रपुर ला तपासणी करीता घेवुन जाण्यास सांगीतले.

चंद्रपुर येथील डॉक्टरांनी त्या पीडित बालिकेची तपासणी केल्या नंतर बालिके सोबत विपरीत घडल्याचे निदर्शनास आले. तातडीने या प्रकरणी शिरपूर पोलिसांना सूचना देण्यात आल्या. तर बालिकेला विश्वासात घेवून विचारणा केली असता तिने घडलेल्या प्रकारा बाबत संपूर्ण माहिती सांगितली.

शिरपुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल राऊत यांनी घटनेचे गांभीर्य ओळखुन पोउनि ढवळे, जमादार सुगत दिवेकर, योगेश ढाले, प्रमोद जुनूनकर, संजय खांडेकर, अनिल सुरपाम यांच्या पथकांसह नायगांव गाठले व आरोपीला बेडया ठोकल्या. याप्रकरणी आरोपींवर बाल लैगिंक अत्याचार अधिनियमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.