WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी बाजारपेठात शुकशुकाट..मोलमजुरावर उपास मारीची वेळ.

Image

कुमार अमोल..

जगभऱ्यात कोरोना व्हायरस ने धुमाकूळ घातला असून सध्या महाराष्ट्रात हा व्हायरस डोकावतोय, माध्यमातून कोरोना व्हायरस ची लागण याबाबत माहिती दिल्या जात असली तरी नेमकं काय व्हायरस चे गणित आहे हे अजून ही समजण्या पलीकडे चालले असे जनतेतून बोलले जात आहे. या व्हायरसमुळे वणी परिसरातील नागरिकात धास्ती भरली असून त्याचा दैनंदिन जीवनावर परिणाम होताना दिसत आहे.

शहरातील शौकीनदार अडचणीत सापडले असून ज्यादा भावाने गरजाऊ वस्तू घ्यावी लागते असे सामान्य नागरिक सांगतात.

"हातावर आणणे आणि पानावर खाने" अशा लोकांवर तर उपास मारीची वेळ येण्याची चिन्हे निर्माण झाली असून शहरात ती काही ठिकाणी पहायला मिळते. संपूर्ण बाजारपेठ थंड बस्त्यात झाली आहे. हॉटेल, पानठेला, मॉल, चहा टपरी याठिकाणी पूर्णतः शुकशुकाट दिसत आहे. कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशी संताप जनक प्रतिक्रिया शहरवाशी देताना आढळून येते. मात्र जुगार आणि आकड्याला सुगीचे दिवस आल्याचे नागरीकातून बोलले जाते.

दरम्यान, नियमाची पायमल्ली होताकामा नये यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज झाली असून शहरात ज्यादा गस्ती वाढविली आहे. येत्या 31 मार्च पर्यंत सगळे शासकीय, खाजगी कार्यालये बंद ठेवली जात आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यास शिक्षा होऊ.. शकते याचे नागरीकानी दखल घ्यावी व शासनास सहकार्य करावे असे परिपत्रक जारी केले आहेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share