WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

उपमुख्यमंत्री अजित पवार : बंद ३१ मार्चपर्यंत नाही तर पुढील आदेश येईपर्यंत

Image

मुंबई : महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ५२ आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येतं आहे की सर्वतोपरी काळजी घ्या आणि गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. गर्दी टाळण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करा असंही आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी सगळ्या सूचनांचं काटेकोर पालन करा असंही सांगितलं आहे. रेल्वे आणि बस या अत्यावश्यक सेवा आहेत त्या बंद करता येणार नाहीत. मात्र आवाहन करुनही गर्दी टळली नाही तर मात्र ते बंद करावं लागेल असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसंच ३१ मार्च नाही तर पुढील आदेशापर्यंत परिस्थिती जैसे थे असेल असंही अजित पवार यांनी स्पष्ट केेलं.

प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढचे १५ दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रत्येक नागरिकाने इच्छाशक्ती दाखवून घरी राहिलं पाहिजे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका कोणीही अफवा पसरवू नका असंही आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. केंद्राला सध्या निधी मागण्याचं कारण नाही. करोनाशी लढा देण्यासाठी राज्य सरकारकडे पुरेसा निधी आहे. लोकांनी गर्दी करणं टाळावं. आपली काळजी आपण घ्यावी त्याची सुरुवात स्वतःपासून करावी असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

रोज विभागीय आयुक्त पत्रकार परिषद घेतात. आज पुणे जिल्ह्याचा आढावा घेतला त्यामुळे आज मी पत्रकार परिषद घेतो आहे आणि तुम्हाला माहिती देतो आहे असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. काही कंपन्यांचं आर्थिक नुकसान होणार आहे मात्र माणूस गमावण्यापेक्षा आर्थिक नुकसान परवडलं त्यामुळे कंपन्यांनी सहकार्य करावं असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

लग्न समारंभही पुढे ढकला. अगदीच शक्य नसेल तर मुलाकडचे आणि मुलीकडचे असे २५ लोक मिळून ते लग्न पार पाडा असंही आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. इतकंच नाही तर दहावा, तेरावा असेल तर तिथेही लोक गर्दी करतात. तिथेही गर्दी करु नका असंही त्यांनी म्हटलं आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share