WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मुख्यमंत्री योगींचे आदेश : कनिका कपूरवर गुन्हा दाखल करा !

Image

लखनऊ- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उच्चस्थरीय बैठक बोलावली. या बैठकीत बॉलिवूड गायिका कनिका कपूर विरोधात एफआयर नोंदवण्याचे आदेश आदित्यनाथांनी दिले. वस्तुस्थिती लपवल्याबद्दल आणि जनमानसाचं आयुष्य धोक्यात घातल्याबद्दल कनिकाविरोधात एफआयआर नोंदविण्यात येणार आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कनिका कपूर करोनाच्या चाचणीत पॉझिटीव्ह निघाली. कनिका येथील ताज या पंचतारांकित हॉटेलमध्ये ६०२ या रूममध्ये राहत होती. ही रूम दोन दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. अधिकारी आता सीसीटीव्ही फुटेजमधून गायिका हॉटेलमध्ये कुठे कुठे फिरली ते शोधत आहेत.

कनिकाच्या पार्टीचे फोटो आले समोर; वसुंधरा राजे, दृष्यंत सिंगही पार्टीत

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने याबद्दल माहिती देताना सांगितले की, 'कनिकाविरोधात एफआयआर दाखल करण्यात येणार आहे. ती लंडनहून परत आली आणि भारतात आल्यावर तिला करोना व्हायरसबद्दल पूर्ण माहिती होती. असं असतानाही विमानतळावर तिने चाचणी केली नाही. करोनाची लक्षणं जाणवत असतानाही ती खुलेआम फिरत राहिली आणि गर्दीतही गेली.'

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.