WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

बेपत्ता बालिकेवर अत्याचार करून खून !

Image

यवतमाळ : नऊ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या उमरखेड तालुक्यातील हातला येथील बालिकेवर लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. बालिकेच्या वर्गमैत्रिणीच्या वडिलानेच अत्याचार करून खून केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोफाळी पोलिसांनी आरोपी गजानन विठ्ठल भुरके (४०), रा.मुळावा, ता. उमरखेड यास अटक केली.

बालिका मुळावा येथील शाळेत दुसरीत शिकत होती. १२ मार्चला हातला येथून ती सायकलने शाळेत जायला निघाली. मात्र आरोपीने तिला शाळेत पोहचण्यापूर्वीच आपल्या दुचाकीवर नेले. ती घरी न आल्यामुळे पालकांनी शोध घेतला. पालकांनी पोफाळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी बालिकेच्या शोधासाठी पाच पथक तयार केली.

स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास घेतला असता, बालिकेस आरोपीने दुचाकीवरून नेल्याचे व आरोपी मुळावा येथील असल्याचेच समजले. मात्र आरोपी घरून पसार झालेला होता. त्यानंतर त्याचे लोकेशन घेऊन शोध घेतला. तो खंडाळा पोलीस हद्दीतील लोहारा तांडा येथे असल्याच समजले. तिथेही आरोपी दुचाकी सोडून फरार झाला होता. त्यानंतर परिसरात रात्रभर शोध घेण्यात आला. शुक्रवारी रोहडा परिसरात आरोपीला ताब्यात घेतले.आरोपीने गुन्ह्यची कबुली दिली. पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.