WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भव्य मोफत नेत्र तपासणी शिबीर....

Image

  • मोतीबिंदू लेन्स शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
  • संकल्प बहुउद्देशीय संस्था तथा क्रांती युवा संघटनेचा पुढाकार
  • Image

    सुरज चाटे वणी :- समता फाउंडेशन मुंबई आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे, वर्धा व संकल्प बहुउद्देशीय संस्था तथा क्रांती युवा संघटना वणी द्वारा आयोजित दिनांक 31 रोज बुधवार ला शेतकरी मंदिर, वसंत जिनिंग वणी येथे भव्य मोफत नेत्र तपासणी शिबीर व मोतीबिंदू लेन्स शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

    वणी येथील शेतकरी मंदिर वसंत जिनिंग वणी येथे भव्य मोफत नेत्र तपासणी शिबीर व मोतीबिंदू लेन्स शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यात नेत्रा संबंधी योग्य मार्गदर्शन तथा आदी विविध योग्य प्रकारे मार्गदर्शन होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रंगनाथ ना सहकारी पतसंस्था वणी तथा अध्यक्ष वसंत जिनिंग वणी चे अड. देविदास काळे, उदघाटक विजयबाबू चोरडिया अध्यक्ष वर्धमान सोशल आर्गनायझेशन वणी, प्रमुख पाहुणे राऊत सर उपविभागीय अधिकारी वणी, राजाभाऊ पाथरडकर संचालक वसंत जिनिंग, प्रशांतजी माधमशेट्टीवार विभागीय अध्यक्ष यवतमाळ अर्बन बँक, राकेशजी खुराणा माजी नगराध्यक्ष तथा उपाध्यक्ष पुसद अर्बन बँक, निलेशजी कटारिया CA, ओमजी ठाकूर माजी अध्यक्ष व्यापारी असोसिएशन वणी, निकेतजी गुप्ता सामाजिक कार्यकर्ता, अविभाऊ भुजबलराव सामाजिक कार्यकर्ता, प्रतापजी तोटावार सामाजिक कार्यकर्ता, आदी उपस्थित राहणार असून या शिबिराची वैशिष्ट्ये शिबिरामध्ये झालेल्या रुग्णांची मोफत आणि योग्य सल्ला व मार्गदर्शन केल्या जाईल, महात्मा फुले जण आरोग्य योजनेत येणाऱ्या शस्त्रक्रिया पूर्णता मोफत, मोती बिंदू असलेल्या रुगणांची मोफत शस्त्रक्रिया केल्या जाईल, मोतीबिंदू असलेल्या व इतर शस्त्रक्रिया रुगणांची आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा येथे मोफत शस्त्रक्रिया केल्या जाईल, मोतीबिंदू ओपरेशन झालेल्या रुग्णांची ने आण करण्याची राहण्याची व जेवणाची मोफत सोय करण्यात येईल, रुग्णांची येताना आधार कार्ड, रेशन कार्ड सोबत आणावे.

    मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांना भरतीची तारीख शिबिराच्या दिवशी देण्यात येईल तथा नाव नोंदणी सकाळी 8 वाजता पासून शिबिरस्थळी करण्यात येईल मोठ्या प्रमाणात गरजुनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संकल्प बहुउद्देशीय संस्था तथा क्रांती युवा संघटना वणी तर्फे करण्यात आले आहे.

    वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



    share