WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जागृत पत्रकार संघाची कार्यकारणी गठीत.....

Image

अध्यक्षपदी संदीप बेसरकर उपाध्यक्षपदी परशुराम पोटे तर सचिवपदी मोहमद मुस्ताक यांची बिनविरोध निवड...

Image सुरज चाटे वणी: वणीमधील जागृत पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाची आज निवड करण्यात आली. ज्यामध्ये वणीतील न्युज आपली वणी मध्ये पत्रकार असलेले संदीप बेसरकर अध्यक्ष,सचिव मोहमद मुस्ताक,उपाध्यक्ष दै.हिंदुस्थान चे पञकार परशुराम पोटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

मागील 15 वर्षांपासून वणी शहरात कार्यरत असलेले जागृत पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची निवड आज 28 ऑक्टोबर रविवार शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली. सभेचे अध्यक्ष जयंत साठे तर प्रमुख अतिथी विदर्भ अध्यक्ष राजू धावांजेवार हे उपस्थित होते. सर्व सदस्यांनी अध्यक्ष म्हणून संदीप बेसरकर, सचिव मोहमद मुस्ताक,उपाध्यक्ष परशुराम पोटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली, संघटना मोठी व्हवी व संघटनेच्या वतीने सामाजिक कार्यात सहभाग घेऊन संघटनेच्या सर्व सदस्यांना सोबत घेऊ कार्य करणार असल्याचे मत नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप बेसरकर यांनी व्यक्त केलं यापुढील जागृत पत्रकार संघटनेची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे असणार अध्यक्ष संदीप बेसरकर, सचिव मोहमद मुस्ताक, उपाध्यक्ष परशुराम पोटे, सहसचिव श्रीकांत किटकुले, प्रसिद्धी प्रमुख महादेव दोडके,सदस्य दीपक छाजेड, इकबाल शेख, विवेक तोटेवार, पुरुषोत्तम नवघरे, सागर मुने, आकाश दुबे, प्रवीण शर्मा, सुरेंद्र बोथर, ज्ञानेश्वर बोनगीरवार, गणेश रांगनकर, रवी कोटावार मार्गदर्शक जयंत साठे असे असणार आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share