WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

शहरात सर्वत्र शांतता.... नागरिकांनी स्वतःच्या रक्षणासाठी घरी रहावे.... ठाणेदार वैभव जाधव यांचे आवाहन

Image

सागर मुने,वणी

रविवारी संपूर्ण देशात जनता कर्फ्यु पाळण्यात आला त्यावेळे संपूर्ण वणी शहर बंद होते. करोना विषाणू चा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी संचार बंदी लावण्यात आली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे तरी पण नागरिक बाहेर फिरतात, त्यामुळे पोलीस बाहेर फिरणार्यांना विचारपूस करीत आहे.

सध्या शहरातील अत्यावश्यक वस्तूचे दुकाने सुरू आहे. ज्यांना खरंच जीवनावश्यक वस्तू ची गरज असेल तर घराच्या बाहेर पडावे तसेच जेष्ठ नागरिक किंवा गरजू व्यक्तीला भोजन किंवा कोणत्याही वस्तूची गरज लागली तर वणीचे पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांनी या नंबर वर 9403418689 फोन करा असे त्यांनी जनतेला आवाहन केले.

नागरिकांनी स्वतःच्या रक्षणासाठी घरीच रहावे असे सरकार च्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. मात्र जनतेच्या सेवेसाठी 24 तास कार्य करणारी पोलीस मंडळी यांना हर्षा आगलावे चहा बिस्किटे देऊन माणुसकीचे दर्शन देत आहे तर सिंधी समाजातर्फे चहा नास्था, थंड पाणी देण्यात येत आहे, काही नागरिकांनी पोलिसांना खायला फळे सुद्धा दिले. सतत काम करणाऱ्या या पोलिसांना तहान भूक लागते याचे भान नागरिकांनी ठेवले आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच या बंद ला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.