WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

रवी गॅस तर्फे सिलेंडरसह मास्कचे वाटप...... कोरोनाला जाळायचंय :- संचालक रवी निखार यांचे मास्क वापरण्याचे आवाहन....

Image

वणी :- सुरज चाटे, जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ

जगात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता या महामारी पासून बचाव करण्यासाठी सम्पूर्ण देश लॉकडाउन करण्यात आला आहे, यात जीवनावश्यक वस्तू किराणा दुकान, भाजीपाला,फळ,दूध,याच सोबत पेट्रोल पंम्प,

तसेच जीवनात आवश्यक वस्तूसह गॅस सिलेंडर ची आवश्यकता असते त्यामुळे ते पुरविण्यात येत असून त्यांसोबतच मास्कचे वाटप करण्यात येत आहेत.

सर्वत्र कोरोना विषाणूच्या महामारीचा सामना करीत असताना प्रशासनाकडून संचारबंदी लावून घरा बाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले असताना व सोमोर कोरोना विषाणू उभा असताना देखील अत्यावश्यक सेवा देण्याकरिता रवी गॅस एजन्सी संचालक रवींद्र निखार व सर्व कर्मचारी मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवाची देखील पर्वा न करता जनसेवा हीच ईश्वरी सेवा असे ब्रीद घेऊन नागरीकाना गॅस सिलेंडर चा वाटप करून सेवा देत आहे, तसेच एजन्सी मध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांना मास्क चे मोफत वाटप करून योग्य ते अंतर ठेवून त्यांना सेवा देऊन कोरोना विषाणूच्या बचावासाठी म्हणून सामाजिक बांधिलकीची जाण ठेऊन निरंतर सेवा देण्यात येत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावा बद्दल जनजागृती करीत आहे. जो पर्यत लॉंगडाउन असेल तो पर्यंत आम्ही अशीच सेवा देत राहू असे मत रवी गॅस एजन्सी संचालक व कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share