WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

हैद्राबाद जवळील कडप्पा येथून कामबंद झाल्याने वापसी करीता भुसावळ करीता पायपीट सुरू !

Image

ग्राहक प्रहारचे जयंता बंडेवार ह्यांनी घेतली दखल !

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील खेड्यात राहणारे, पोटा करीता हैद्राबाद जवळील कडप्पा ह्या गावात केळी कापण्याचे कामावर हे लोक मजुरीने कामावर होते अचानक भारतात लॉक डाउन जाहीर झाल्याने ह्यांचा मुकार्डांम भूमिगत झाला परतीचा प्रवास कसा करावा काही सुचेनासे झाले सर्व पायी निघाले पांढरकवडा उमरी जवळ ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्ह्याचे कार्यकर्ते तथा शिवसेनेचे तालुका संघटक जयंता बांडेवार ह्यांचे निदर्शनास हे लोक पडले त्यांनी त्यांना सायखेडा येथील धाब्यावर

त्यांच्या खाण्याची व्यवस्था केली तिथेच थांबण्याची विनंती केली पण ते पायी जाणार आहे .

शासनाने सर्व प्रकारच्या भारत बंद अंतर्गत सोयी जाहीर केल्या पण अश्या लोकांना घरपर्यंत पोचविण्याचे कोणतेही नियोजन नाही शासनाने ह्या लोकांना घरपर्यंत कसे पोचवाचे ह्याची तरतूद नाही पण येथील तहसीलदार सुरेश कव्हले ह्यांना ह्या बाबत ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर ह्यांनी सविस्तर सांगितले असता ते म्हणाले ह्या दोन दिवसात अश्या 200 लोकांना विविध ट्रक मधून त्यांना त्याचे गावी पोचविण्याचे काम केले हे लोक माझ्या संपर्कात आले नाही तरी हरकत नाही त्या लोकांना रुंझा आऊट पोस्ट पोलीस स्टेशन मध्ये जायला सांगा तिथून त्यांना विविध ट्रक मधून त्यांचे गावी पोचवीण्याची व्यवस्था करण्यात येईल !ह्या बाबत जयंता बंडेवार ह्यांनी शिवसेनेचे पंकज तोडसाम ह्यांना सांगून पुढील सहकार्य करण्यात येणार आहे !

जयंता बडेवार सोबत, प्रकाश प्रधान ,राहुल वडेवार ,राजू बंडेवार अनुप ताठे हजर होते.

मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी जी धडपड केली त्या बाबत ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा सल्लागार हनुमंतू रजनलवार ह्यांनी अभिनंदन केले आहे .

आपला

प्रसाद नावलेकर

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share