WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पोलिसांचा परिवार बघत असतो.. निरंतर त्यांची वाट.....

Image

वणी शहर प्रतिनिधी :-निलेश चौधरी

सध्या जगभरात सर्वत्र, धुमाकूळ घालणारा कोरोना वायरसची दहशत सध्या इतकी पसरली आहे की..त्यापासून पोलिस प्रशासन सुध्दा हादरलेले आहे.

भल्या-भल्या गुन्हेगारांना घाम फोडणारे पोलिस प्रशासनानी , सुध्दा कोरोनाची धास्ती घेतली आहे. दिवसभर जनतेच्या सेवेसाठी कर्तव्यात असलेल्या पोलिस कर्मचार्या चे हजारो लोकांन सोबत संपर्क येत असतात. त्यामुळे या जिवघेण्या वायरस पासुन, बचावा करतांना भितीचे वातावरण असते.

याच संदर्भात वणी सिटीच्या प्रतिनिधीनी एपीआय बाजड सरांशी चर्चा केली असता.

कळले की, ड्युटी संपल्यावर जेव्हा जेव्हा घरचा विचार डोळ्यासमोर येतो तेव्हा, पत्नी, मुले यांच्या संरक्षणाची जबाबदारी डोळ्यासमोर येते .दिवसभर जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणारे पोलिस, आपल्या परिवारासाठी तितकेच तत्पर असावे लागतात. त्यामुळे घराच्या अंगणात गेल्या बरोबर प्रथमतः सॅनिटाझरने हात धुवून, पूर्ण स्वछ होऊन...मगच चिमुकल्यांचा लाड करावा लागतो.अशी आपबिती एपीआय बाजड सर यांनी व्यक्त केली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share